शनिवार, 9 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

देव पूजेच्या वेळी बसण्याचे नियम

देव नेहमी आपल्या समोर उच्च आसनावर ठेवावेत. आपल्या उजव्या बाजूस पूजेचे साहित्य व डाव्या बाजूस
पाण्याचा तांब्या ठेवा.देवाच्या चौरंगावर देव्हाऱ्यात आपल्या उजव्या बाजूस शंख व आपल्या डाव्या बाजूस घंटा ठेवावी.

देवाच्या उजव्या बाजूस तुपाचा व डाव्या बाजूस तेला दिवा ठेवावा. पूजेला दर्शनाला जाताना व पुजेला बसताना काही सूचनाचप्पल घालून देवाच्या पुजेला जावू नये. वाहनात बसून पूजेला जावू नये. देवाच्या उत्साहात सेवा करावी.

देवळात गेल्यावर देवाला साष्टांग नमस्कार घालावा. अशौचात देवाची पूजा करू नये. गप्पा मारीत, बडबड करीत पूजा करू नये. खोटे बोलत मोठ्याने ओरडत पूजा करू नये. स्त्रियांचा अनादर व अश्लील गप्पा मारत पूजा करू नये. स्नान करून उत्साहाने,  आनंदाने देव पूजा करावी.