शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Updated : शनिवार, 20 ऑक्टोबर 2018 (07:50 IST)

देवपूजेत या धातूची भांडी वापरू नयेत!

देवाची पूजा करताना अनेक प्रकारची भांडी वापरली जातात. आपण जी भांडी वापतरो ती कोणत्या धातूंची असावीत आणि कोणत्या धातूंची नसावीत या बाबतीत काही नियम सांगितले गेले आहेत. जे धातू वर्ज्य केले आहेत त्यांचा उपयोग पूजेत करू नये. असे केले तर धर्म, कर्माचे पूर्ण पुण्य प्राप्त होत नाही. देवाची पूजा केल्याने जीवनातील सर्व संकट दूर होतात. पूजेत भांड्यांचेही खूप महत्त्व आहे. शास्त्रानुसार वेग-वेगळे धातू वेग-वेगळे फळ देतात. त्यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक कारण आहे. सोने, चांदी, तांबे, पितळ या धातूंपासून बनवलेल्या भांड्यांचा उपयोग करू नये. देवपूजा आणि धार्मिक कार्यात लोखंड, स्टील आणि अ‍ॅल्युमिनियम या धातूंना अपवित्र मानले गेले आहे. या धातूंपासून देवाच्या मुर्तीही तयार केल्या जात नाहीत.
 
लोखंडाला हवा, पाण्यामुळे गंज लागतो. देवपूजेत मूर्तीला पाणी वाहिले जाते. त्यामुळे लोखंडाला लागलेल्या गंजामुळे आपल्या त्वचेवर त्याचा वाईट प्रभाव पडतो. त्यामुळे लोखंड देवपूजेसाठी वर्ज्य आहे. देवपूजेत सोने, चांदी, तांबे, पितळ या धूतूंच्या भांड्याचा उपयोग करावा. या धातूंपासून आपल्या त्वचेला कोणताही त्रास होत नाही.