श्री गजानन महाराजांच्या आयुष्यातील एक प्रसंग : जेव्हा महाराज काळाराम मंदिराच्या जवळ येऊन थांबले

kalaram mandir nasik
Last Updated: गुरूवार, 3 सप्टेंबर 2020 (12:11 IST)
जन्मतः अष्टसिध्दी प्राप्त असलेल्या महाराजांनी जीवदशेला आल्यावर सर्व मर्यादांचे पालन केले. अक्कलकोटाला श्री स्वामी समर्थांजवळ राहिल्यानंतर महाराज नासिक पंचवटी येथे साधना करू लागले. ही साधना चालली असताना महाराजांच्या अलौकिक रामभक्तिचा प्रत्यय देणारी महान घटना पंचवटीत घडली.

साधना सुरू करण्यापूर्वी पंचवटीत रामदर्शन करावं म्हणून काळाराम मंदिराच्या जवळ येऊन थांबले. दुपारी बाराचा सुमार , रणरणत ऊन, मंदिराची दार बंद
करून पुजारी लगबगीनं जाण्याच्या बेतात असलेला, अशावेळी २० —२२ वर्षाचे
महाराज दारात येऊन उभे राहिले. महाराज मंदिराच्या दारात उभे आहेत याकडे त्या

पुजार्‍याने लक्षही दिले नाही. नेहमीच्या सरावाने दार बंद करण्यासाठी ओढणार, एवढ्यात महाराजांनी एक पाय बंद असलेल्या दरवाज्यात ठेवला, आणि काय आश्चर्य
महाराजांचा पाय मंदिरात पडताच मंदिरातील भव्य घंटा खणखणून वाजू लागल्या. घट्टांचा असा घणघणाट सुरू झाला की पुजारी अवाक होऊन बघत राहिले.

महाराजांच्या आतापर्यंतच तेजोवलय त्यांच्या व्यक्तिमत्त्व भोवती गरगरू लागले. पुजारी एका कोपर्‍यात उभे राहून ते दृश्य भारावल्यासारखे बघत होते. त्यांना जागच हालता येईना.

महाराज महाव्दार ओलांडून आत आले आणि रामरायाच्या चरणावर लांबूनच नतमस्तक झाले. तो आश्चर्य असे की महाराजांनी रामरायाला प्रणिपात करताच रामरायांच्या चरणावरची फुले भरभर उडून महाराजांच्या मस्तकावर येऊन पडली.

स्वागत केले निजभक्ताचे करुनी घंटानाद ।
भक्त लाडका भेटी आला।
हर्षुनी फुले चरणावरची देती आशीर्वाद ।

रामरायाला दंडवत घालून महाराजांनी मस्तक वर उचललं तो गाभार्‍यातून प्रकाशाचा एक प्रखर आणि तेजस्वी असा झोत महाराजांच्या डोळ्याला येऊन भिडला आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वात भिनून गेला.

हा चमत्कार पाहून पुजारी धावून महाराजांच्या पायाला कडकडून मिठी मारली. रामरायांचा महाराजांना अनुग्रह मिळाला आणि महाराजांच्या कृपादृष्टीने पुजारी पावन झाला. हा रामभक्तीचा प्रवाह त्यांच्या अनेक लीलांमधून पुन्हा पुन्हा खळखळत राहिला.

शेगावात आजही रामनवमीचा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.
म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात.....

काय वानू आता न पुरे हे वाणी।
मस्तक चरणी ठेवीतले।
तुका म्हणे सुख पविया सुखे.
अमृतहे मुखे स्त्रवतसे

श्री गजानन महाराज की जय।


यावर अधिक वाचा :

दैनिक राशिभविष्य

महाशिवरात्री : शिव मंत्र जपा, सुख-समृद्धी मिळवा

महाशिवरात्री : शिव मंत्र जपा, सुख-समृद्धी मिळवा
महाशिवरात्रीवर महादेवाची पूजा आराधना केली जाते. सुख, शांति, धन, समृद्धी, यश, प्रगती, ...

श्री गजानन विजय ग्रंथ बोधामृत

श्री गजानन विजय ग्रंथ बोधामृत
पहिल्या अध्यायी, सांगे गजानन अन्न पूर्णब्रह्म, ठेवा आठवण दुसऱ्या अध्यायी, सांगे ...

विजया एकादशी 2021 : मुहूर्त आणि विशेष गोष्टी जाणून घ्या

विजया एकादशी 2021 : मुहूर्त आणि विशेष गोष्टी जाणून घ्या
1. विजया एकादशी व्रत केल्याने अतिशय गंभीर आजरापासून देखील मुक्ती मिळते. 2. हे व्रत ...

दक्षिण काली म्हणजे काय आणि विशेष मंत्र कोणतं, जाणून घ्या

दक्षिण काली म्हणजे काय आणि विशेष मंत्र कोणतं, जाणून घ्या
माता कालिकेचे अनेक रूप आहेत ज्यापैकी प्रमुख आहे- 1. दक्षिणा काली, 2. शमशान काली, 3. ...

गजानन महाराज जळत्या पलंगावर बसून राहिले

गजानन महाराज जळत्या पलंगावर बसून राहिले
स्वामी भास्करासह आडगावात दत्त मंदिरात उतरले. भक्त मंडळींनी दर्शनास गर्दी केली. आडगावचे ...

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट ...

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट विमानसेवा सुरू करणार आहे
हैदराबादहून आता मालदीवला जाणे सोपे होईल. खरं तर, परवडणारी सेवा देणारी विमान कंपनीची गोएअर ...

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा
प्रत्येक देशात वेगवेगळे कायदे असतात अशात संयुक्त अरब अमिरातील देखील काही कायदे अत्यंत कडक ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची दंड वसुली
मुंबईत कोरोना विषाणुचे संकट कमी होत असले तरी मुंबईकर मात्र कोरोना गांभीर्याने घेत ...

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार
आशिया खंडातील सर्वात मोठा आणि सर्वात प्रतिष्ठित कला महोत्सव म्हणून ओळखला जाणारा काळाघोडा ...

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे आयोजन
पर्यटन संचालनालयामार्फत राज्यातील कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या सहा ...