शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

Hindu Dharma : तेहतीस कोटी देव कोणते ?

* बहुतेक लोकांना 'तेहतीस कोटी' चा अर्थ 'तेहतीस करोड'*
*असाच वाटत असतो .* *पण मुळात संस्कृतात "कोटी" या शब्दाचा*
*अर्थ करोड नसून 'प्रकार'  असा आहे. कल्पना अशी आहे की*
*ईश्वराने निसर्गाचे व्यवस्थापन करण्यासाठी ३३ देवांना कार्यभार*
*सोपवले आहेत. त्यांच्यात ८ वसू, ११ रूद्र, १२ आदीत्य, १ इंद्र*
*आणि १ प्रजापती असे पाच स्तर आहेत .*
*प्रत्येकाचे कार्य (खाते) भिन्न* *असल्याने प्रत्येकाला* *वेगळी कोटी* *(कॅटेगरी) दिलेली आहे.*
*अष्टवसूंची नावे -* *आप, धृव, सोम, धर, अनिल,  अनल, प्रत्यूष आणि प्रभास .* 
*अकरा रूद्रांची नावे - मनु, मन्यु, महत, शिव, ऋतुध्वज, महीनस, उम्रतेरस, काल, वामदेव, भव आणि धृत-ध्वज.*
*बारा आदित्यांची नावे -* *अंशुमान, अर्यमन, इंद्र,* *त्वष्टा, धानू, पर्जन्य, पूषन, भग,* *मित्र,* *वरूण,* *वैवस्वत* *व विष्णू*
*असे एकंदर* *८+११+१२+१+१ = ३३.*