1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: गुरूवार, 9 मे 2024 (07:54 IST)

काय अजूनही जिवंत आहेत भगवान परशुराम? कुठे तपश्चर्या करतात माहीत आहे का?

parshuram jayanti
भगवान विष्णूचा अवतार असलेल्या परशुराम बद्दल आपल्या सर्वांना माहिती आहे. रागाच्या भरात परशुरामाने 21 वेळा पृथ्वीवरून क्षत्रियांचा नाश केला होता. यानंतर त्यांनी ही भूमी महर्षी कश्यप यांना दान केली आणि स्वतः तपश्चर्या करण्यासाठी गुप्त ठिकाणी गेले. असे मानले जाते की भगवान परशुराम अजूनही जिवंत आहेत, परंतु ते कोठे आहेत याचा उल्लेख कोणत्याही धर्मग्रंथात नाही. परशुराम यांच्याबद्दल काही रोचक माहिती जाणून घ्या…
 
काय खरंच जिवंत आहे भगवान परशुराम?
धर्म ग्रंथामध्ये एक श्लोक आहे ज्यात अष्ट चिरंजीवांचे वर्णन आहे, अर्थात ते आठ लोक जे अमर आहेत. हा श्लोक पुढीलप्रमाणे आहे-
 
अश्वत्थामा बलिव्यासो हनूमांश्च विभीषण:।
कृप: परशुरामश्च सप्तएतै चिरजीविन:॥
सप्तैतान् संस्मरेन्नित्यं मार्कण्डेयमथाष्टमम्।
जीवेद्वर्षशतं सोपि सर्वव्याधिविवर्जित।।
 
अर्थ- अश्वथामा, दैत्यराज बलि, वेद व्यास, हनुमान, विभीषण, कृपाचार्य, परशुराम आणि मार्कण्डेय ऋषि हे सर्व अमर आहे. दररोज सकाळी या 8 नावांचे जप केल्याने भक्तांना निरोगी काया आणि दीर्घायुष्य प्राप्त होते.
 
रामापासून परशुराम कसे झाले?
धर्मग्रंथानुसार, बालपणी परशुरामचे आई-वडील त्यांना राम म्हणत. ते मोठे झाल्यावर त्याला वडिलांकडून वेदांची शिकवण मिळाली. यानंतर त्यांना शस्त्र शिकण्याची इच्छा निर्माण झाली. पिता जमदग्नी यांच्या सांगण्यावरून त्यांनी भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली. प्रसन्न होऊन भगवान शिवाने त्याला अनेक दैवी शस्त्रे दिली. त्यापैकी एक परशु (फरसा) होती. हे शस्त्र रामाला अतिशय प्रिय होते. हे प्राप्त होताच रामाचे नाव परशुराम झाले.
 
परशुराम कुठे आहेत?
धार्मिक ग्रंथांवर विश्वास ठेवायचा झाल्यास भगवान परशुराम महेंद्र पर्वतावर राहतात. सध्या ओरिसातील गजपती जिल्ह्यातील परालखेमुंडी येथे महेंद्र पर्वत आहे. हा डोंगर धार्मिक आणि ऐतिहासिक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. यासंबंधीच्या अनेक कथा रामायण आणि महाभारतात आढळतात. असे मानले जाते की आजही भगवान परशुराम या पर्वताच्या एका गुप्त गुहेत तपश्चर्या करत आहेत.

Disclaimer : येथे देण्यात आलेली माहिती ज्योतिष, पंचांग, धर्म ग्रंथ आणि मान्यतेवर आधारित आहे. ही केवळ सूचना प्रदान करण्यासाठी दिली गेली आहे. अधिक माहितीसाठी तज्ञांशी संपर्क करा.