1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

श्री परशुराम माहत्म्य अध्याय ३२

श्रीगणेशाय नमः ॥ श्रीबिभीषणवरप्रदाय नमः ॥
जय जया आनंदधामा ॥ भक्तकाज कल्पद्रुमा जन्मादि रहिता परशुरामा परमात्मा तूंचि एक ॥१॥
परशुराम अनंतशक्ती प्रगटोनि भूमीवरतीं नाशिली गोब्राह्मण आर्त्ती अगाध कीर्ती विस्तारिली ॥२॥
तया माझें असो नमन ऋषी करिती पुनः प्रश्न वेदशास्त्रींचें ज्ञान सांगावया कोण गुरु जाले ॥३॥
ऐसें ऐकोन ऋषी वचन सूत जाला अति प्रसन्न ह्मणे ऐका चित्त देऊन गुरु परंपरां कथन सांगतों ॥४॥
जो का परब्रह्म वस्तू भगवान चिंदानंद ईश्‍वर नारायण त्याचें निःसंशय ज्ञान परंपरे करुन आलें असे ॥५॥
अनादि लक्ष्मी नारायण त्यांणी आदिनिर्मिलें पद्म त्यांतूनि ब्रह्मा उत्पन्न जगत उत्पन्न करावया ॥६॥
मग एक मुख्य प्राण तो नारायणा पासून होऊनि विधीचें सात्द्यपूर्ण केलें बल भीमपणें ॥७॥
प्राणात्मक सर्व जगत प्राणाद्वायू रजायत प्राणाच्या योगें विश्‍वोत्पादित पद्मभू तो ब्रह्मा ॥८॥
ब्रह्मदेवाचा दुय्यम तो मुख्य प्राण जाण तयाची ख्याती नसे कारन सांगतों मी ॥९॥
शाप असे कण्वऋषीचा कीर्ती न होतील प्राणाच्या परी गुरु तो सकळाचा ह्मणोनि किंचित ख्याती पैं ॥१०॥
किंचित जी प्रख्याती ती देवाची ओळखती कां कीं गुरु तो विश्‍वाप्रती आणि पूर्ण भक्त हरीचा ॥११॥
कर्ता हर्तापालक सकळ विश्‍वाचा चाळक ह्मणोनि प्राणाचे सेवक सर्व विश्‍वे असती ॥१२॥
प्राण सर्वत्र असोन नेणे कोणी तयालागून कण्व ऋषीच्या शापेंकरुन काय मोह न मायेचें ॥१३॥
ब्रह्मदेव मुख्य प्राण जगज्जिवना हें कारण ह्मणोन यांच्या आहुतीविण जेऊं नये द्विजांनीं ॥१४॥
मुख्य प्राणाचें महात्म्य अत्यंत स्कंद पुराणीं नारद विस्तृत भक्तिमंत अंबरीषी प्रत सांगत आदरें ॥१५॥
तीं येथें विस्तारें वर्णितां होईल ग्रंथ विस्तारता ह्मणोनि वर्णिली सारांश कथा सावधान परिसीजे ॥१६॥
केशी क्षेत्रज्ञ प्रभंजन सूत्र प्राण चैतन्य जाण ऐशीये त्याचें नामाभिधान घेतां पाप दहन होइजे ॥१७॥
त्याचे अवतारती न जगतीं पूर्णप्रज्ञ भीम मारुती त्यांणीं सत्धर्मपद्धती विप्रजातीच्या रक्षिल्या ॥१८॥
असो आतां सद्गुरु परंपरा कथापावन पापहरा ऐकतां ज्ञान अवधारा मुक्ति योग्य होतसे ॥१९॥
श्लोक ॥ देवऽर्षिणां आदिगुरुःपिता च बृहस्पतिः परमावार विश्व ॥ परात्परो हंसगुरु स्वयं योरनादि नारायण एव जात ॥१॥
बृहस्पति र्धर्मगुरुरर्थ कामगुरुःपिता, साक्षान्नारायणो देवो हंसो मोक्षगुरु स्मृतः ॥२॥
परंपरा साहंसस्य पालिता मुनिना क्वचित् ॥ दुर्घटत्वाद्यतीधर्मःकलौ वैष्णव वर्जिते ॥३॥
रुपेद्वे देव देवस्य चरेचा चरमेवच ॥ चरं संन्यासिनं प्राहुर चरंचक्र चिन्हितं ॥४॥
अग्निहोत्रं गवालंबं संन्यासंपल पैतृकं ॥ देवराच्चसुतो त्पत्तीक लौपंचविवर्जयेत्‌ ॥५॥
विश्‍वांमध्यें ज्ञानाकारण स्वयें परम पुरुषनारायण गुरुहंसरुपें होऊन उपदेशिलें ब्रहम्यासीं ॥२०॥
मग ब्रह्मा गुरुत्वासी करोनि पावले पूर्णतेसी सनत्कुमार अल्पवयसी गुरुत्व केलें ॥२१॥
विरक्त होऊनि शंकर बैसला गुरुपीठावर तेणें उपदेशिला वेदांत सार श्रीराममंत्र सर्वांसीं ॥२२॥
तेथोनि जाहले भ्रुगुऋषी पूजन केलें त्‍हृषीकेशी शासन केलें असुरांसी तपश्चर्येसी मग गेले ॥२३॥
पुढें शिव अवतारोनि नामें दूर्वास तो मुनी सत्धर्में वर्तवोनि अवनी हिमाचळीं ते गेले ॥२४॥
त्याचे शिष्यपर तीर्थमुनी त्याणें तोषिला गुरुसेवेकरुनी तंव ते दुर्वास प्रसन्न होऊनी दिधला वर कीर्तीचा ॥२५॥
आतां कलियुगा माझारीं तुझे तीर्थनाम भूमीवरी पदवी चालेल गुरु परंपरी शिष्य प्रशिष्यें करोनि ॥२६॥
तेव्हां पासोनी जगद्गुरु तीर्थसंज्ञ झाले अपारु त्यापासोनि सत्य प्राज्ञथोरु सत्य प्राज्ञतीर्थ ह्मणती तया ॥२७॥
तेथोनि जालें प्राज्ञतीर्थ धर्मरक्षोनी धर्म रक्षोनी यथार्थ गुरुत्व देऊं शिष्याप्रत नारायण पदीं आरुढले ॥२८॥
पुढें ब्रह्मांशें करुनी झाले अच्युत प्रेक्ष्य नामानीं तेव्हां पाषंडें पूर्ण अवनीं ब्राह्मण भ्रष्ट जाहले ॥२९॥
सर्व वर्ण संकरमार्गी विपरीत मती बहिरागी कली मातलासे वेगीं रक्षास्थि लिंगी सर्व झाले ॥३०॥
जागो जाग असुर होती आणि आपणा ईश्‍वर ह्मणती नाना प्रकारचे दृष्टांत देती करिती वेदार्थ विपरीत ॥३१॥
खरा मार्ग लोपविती मनीं विकल्प उद्भविती पंचभेद तारतम्यें बुडविती दूषिती सत्धर्म मार्गातें ॥३२॥
कांहीं जे कासद्ब्राह्मण द्रुर्मिल देशीचे उत्तमोत्तम आपुल्या गुरुसी गेले शरण महान अच्युत प्रेक्ष तीर्थासी ॥३३॥
ते जगद्गुरु सर्वज्ञ बोलती होणार पूर्ण प्रज्ञ तो मुख्य प्राण ब्रह्मज्ञ अवतार रुपें प्रगटेल ॥३४॥
ब्राह्मणा तें रक्षील विष्णुभक्ती तें वाढवील पाषंडियासी जिंकील ईश्‍वराज्ञेनी ॥३५॥
जैसें वेदव्यासें कथिलें तैसी ब्राह्मणा शिक्षा करील रजत पीठ क्षेत्रीं वाढवील कृष्णमहात्म्य अपार ॥३६॥
ऐसें अच्युत प्रेक्षाचें वचन घेवोनी करिती अनुष्ठान जाला कांहीं एक दिवसान मध्वनामें करुनी ॥३७॥
ब्राह्मणांसी आनंद जाला देव वाजवीती दुंदुंभीला दुर्जन पावती भयाला श्रून्य वादाला घेती ते ॥३८॥
पंचमे ब्रह्मवर्चस काम पित्यानें केलें मौंजीबंधन सहाव्यांत संन्यास ग्रहण महागुरु पासूनि घेतला ॥३९॥
बैसले गुरुपीठासी महासत्व केलें देवद्विजांचें गुरुत्व प्राकाशिलें वेदांत तत्व व्यास वाक्य समुधृती ॥४०॥
प्रच्छन्न बौद्धाचा निग्रह वैष्णवत्वाचा संग्रह ऐसें वेदमार्ग स्थितीला इह ईशाज्ञा संपादिली ॥४१॥
ऐसा त्रिलोक गुरु मध्वजाण तिसरा अवतार हा मुख्य प्राण होवोनी ब्राह्मणांचें रक्षण करुनी नारायण तोषविला ॥४२॥
तिकडे धर्म रक्षिला काय काजें तरी तेथें ब्राह्मन राहिले पाहिजे कां कीं ईश्‍वरावतार होइजे अंताविषयीं कलीच्या ॥४३॥
कर्नाटकीं द्रुमिल देशीं शंभल ग्रामीं विष्णुयश त्याचे घरीं कलंकी ईश होऊनि कृतयुग करतीते ॥४४॥
ऐसें महागुरुचरित्र ऐकतां प्राणी होती पवित्र पावती धनधान्य पुत्र श्रीहरी कृपा होईजे ॥४५॥
मध्व मुनीचें आनंदतीर्थ ऐसीच पदवी चालली यथार्थ महागुरुची सतत तीर्थतीर्थ ह्मणोनी ॥४६॥
जे का म्ध्व महान त्यांचीं ऐका नामाभिधान पूर्णप्रज्ञ मध्व आनंद तीर्थ जाण तिहीं करुन ख्याती असे ॥४७॥
महागुरुची परंपरा सांगीतली समूळ विस्तारा जेथे देवऋषी करिती अवतारा जगदीश्‍वरा तोषविती ॥४८॥
जेथें शंख चक्रादिके ईशभक्ती सत्कर्म आपुलें न सोडिती त्यांस जाणा देव ऋषी विभूती विश्‍व करिती पवित्रतें ॥४९॥
भारत शास्त्रातें ज्यांची प्रीती ब्रह्मविद्येतें विचार करिती त्यां जाणा देवर्षी विभूती विश्‍व करिती पवित्रते ॥५०॥
श्लोक ॥ ये कंठ लग्न तुलसी नलिनाक्ष माये बाहुमुल परि चिन्हि तु शंख चक्राः ॥
येवा ललाट पल केलस दुर्ध्व पूंडं ते वैष्णवा भुवन माशु पवित्रयंतीऽतिपाद्ये ॥१॥
स्वयंभूर्नारदःशंभुःकुमार कपिलो मनुः ॥
प्रर्‍हादो जनको भीष्मो बलि वैय्यास किर्वयं ॥२॥
द्वादशैते विजानीमो धर्मं भागवतं भटाःइति भागवते ॥
ऐसें पूर्वीं धर्मराज वदले भक्त महात्म्य गुज त्या भक्तांचे चरणरज मज मस्तकीं असो ॥५२॥
ईश्‍वराची अगाध करणी वर्णितां थकली वेदवाणी काय वर्णितों अल्पगुणी परी सारांशें करोनि कथियेलें ॥५३॥
यथामति कथा कथिली ओवी बत्धती गुंफिली ईश चरणारविंदीं अर्पिली संतमंडळी कृपा करोत ॥५४॥
जें का ग्रंथीं न्यून संकलित ते कृपेनि अन्यत्र पाहोत येथें सूचना किंचित जाणा अत्यंत श्रोते हो ॥५५॥
श्लोक ॥ अलोढ्य सर्वशास्त्राणी विचार्यच पुनः पुनः ॥
इदमे कंसु निष्पन्नं ध्येयो नारायणः सदा ॥१॥
इतिलैंगे ॥ यथार्थ पाहतां सर्वशास्त्र ध्येय श्रीपती रुप अजस्त्र जें वर्णिती संत सर्वत्र तें वर्णिलें यथामती ॥५६॥
वेद ह्मणती नेतिनेती तेथें आपणाची काय गणती परी चरणीं धरोनि अतिप्रीती स्वधर्मे भक्ती आचरावी ॥५७॥
ज्यांच्या मांडीवरी बैसावें तयासीं ओळखावें त्यांच्या चरणींच भजावें सर्वकाळ श्रोते हो ॥५८॥
परशुरामाची अद्भुत कथा भाविकें पारायण करितां होय इच्छिताची पूर्तता सायोज्यता पावती ॥५९॥
लक्ष्मी केशवाचा बाळक व्यासाचा शिष्य श्रीशुक सांगतां श्रोते सकळिक परमानंदीं बुडाले ॥६०॥
सर्वाभीष्ट दातारा देवा घेतली आमुची सुसेवा तरी माझिया कुलदेवा लक्ष्मी केशवा नमोस्तुते ॥६१॥
स्वस्तिश्री परशुरामविजय कल्पतरु वर्णितां महात्म्य अपारु ऐकतां निःपाप होती नरु द्वात्रिंशोऽध्याय गोड हा ॥३२॥श्रीकंसांतकार्पणमस्तु ॥