सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 30 ऑगस्ट 2018 (12:37 IST)

चीनमधील रहस्यमयी गुप्त शहर

चीनमध्ये अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या जगासाठी कुतूहल व उत्सुकतेचा विषय आहेत. चीनची राजधानी बीजिंगमध्येही असेच अद्भुत गुप्त शहर असून तेही सगळ्यांसाठी गूढ ठरले आहे. या अनोख्या शहराच्या निर्मितीचे श्रेय चीनमधील कम्युनिस्ट क्रांतिकारी माओ जेडांग यांना जाते. आजही अनेकजणया गुप्त शहराची रहस्ये शोधण्याचा प्रयत्न करतात, पण मार्गात येणारे नाना प्रकारचे अडथळे त्यांचा हा मनसुबा उधळून लावतात. या गुप्त निर्मितीस सोव्हिएत संघ व चीन यांच्यातील सिनोऐसोव्हियत सीमावाद कारण ठरला होता. 1969मध्ये हा वाद चांगलाच पेटला होता. माओ जेडांग यांनी सोव्हिएत आक्रमणापासून बीजिंगचा बचाव करण्यासाठी या गुप्त शहराची निर्मिती केली होती. कोणत्याही हल्ल्यात पूर्ण सुरक्षा देण्याच्या हेतूने त्याची रचना करण्यात आली होती. 1970मध्ये बनलेल्या या शहरात बॉम्ब वा अन्य कोणत्याही हल्ल्यातून वाचण्यासाठी तिथे खास प्रकारच्या दिव्यांना महत्त्व देण्यात आले होते. या शहरातील गुहा 10 मीटर रुंद बनविण्यात आल्या होत्या. त्यांच्यावर तब्बल 70 हजार मजूर मेहनत घेत होते. मात्र काळाच्या ओघात या शहराला बरेच नुकसान पोहोचले आहे. त्यातून गटारीप्रमाणे पाणीही वाहू लागले आहे. सुमारे 85 चौरस किलोमीटर क्षेत्रावर पसरलेल्या या शहरात एक हजार रचना अशा आहेत, जिथे कोणत्याही प्रकारचा आकाशीय हल्ला झाला तरी लोक सुरक्षित राहू शकतात. त्यात 90 प्रदेशद्वारे, थिएटर, दुकाने, हॉटेल, शाळा, वाचनालये, कारखाने आणि गुदामेसुद्धा आहेत. तिथे तापमान 27 अंशाच्या आसपास असायचे.