शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 13 जून 2018 (08:41 IST)

किम जोंग आणखी एक विचित्र प्रकार उघड

सिंगापूरमध्ये अमेरिकेसोबत शिखर परिषदेसाठी आलेल्या उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोंग यांची सोय जरी सेंट रेगीस या पंचतारांकीत हॉटेलात झाली असली तरी त्यांनी स्वतः सोबत स्वतःचं पोर्टेबल टॉयलेट आणलं आहे. याआधी टॉयलेट त्यांनी दक्षिण कोरियाच्या अध्यक्षांना भेटतानाही सोबत नेलं होतं. एवढंच नाही तर अगदी उत्तर कोरियातही फिरताना ते स्वतःचं टॉयलेट घेऊन जातात. स्वतःच्या विष्ठेतून त्यांच्या आयुष्यातली गुपीतं परदेशी गुप्तहेर शोधून काढतील अशी भीती त्यांना वाटते म्हणे. त्यांना असलेल्या विकारांचा याद्वारे शत्रूंना शोध लागला तर त्याचा गैरफायदा घेतला जाईल अशी भिती त्यांना सतावते. म्हणून किम जोंग ऊन जिथे जातात तिथे त्यांचं स्वतःचं टॉयलेटच घेऊन जातात.