शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

मोदीची तुलना हुकूमशाहा किम जोंगशी, २३ जणांवर गुन्हा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना उत्तर कोरियाचे हुकूमशाहा किम जोंग उन यांच्याशी केल्याप्रकरणी कानपूरमधील २३ व्यापाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित व्यापाऱ्यांनी कानपूर शहरात अनेक ठिकाणी मोदींची किम जोंगशी तुलना करणारी पोस्टर लावली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
 
कानपूरमधील बँकांमध्ये १० रुपयांची नाणी स्वीकारली जात नसल्यानं येथील व्यापारी वैतागले आहेत. या परिस्थितीला पंतप्रधान मोदीच जबाबदार आहेत, असं त्यांचं म्हणणं आहे. याच नाराजीतून त्यांनी मोदींवर हुकूमशाहीचा आरोप केला आहे. तशी पोस्टरच त्यांनी झळकावली आहेत. पोस्टरच्या अर्ध्या भागात किम जोंग यांचा फोटो आहे आणि त्यापुढं ‘मी जगाला नष्ट केल्याशिवाय शांत बसणार नाही ‘ असं लिहिलं आहे, तर पोस्टरच्या दुसऱ्या भागात नरेंद्र मोदींचा फोटो असून त्यापुढं ‘मी व्यापाऱ्याला नष्ट केल्याशिवाय शांत बसणार नाही’ असं लिहिण्यात आलं आहे. प्रवीण कुमार अग्निहोत्री नावाच्या इसमाला हे पोस्टर लावताना पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यानंतर २३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.