बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 21 ऑक्टोबर 2017 (10:58 IST)

वैद्यकीय मदतीसाठी पाकिस्तानमधील प्रत्येक व्यक्तीला व्हिसा देऊ

वैद्यकीय मदतीची आवश्यकता असलेल्या पाकिस्तानमधील प्रत्येक व्यक्तीला व्हिसा दिला जाईल, अशी माहिती परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी दिली आहे. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर आपण ही घोषणा करत असल्याचेही स्वराज यांनी सांगितले. पाकिस्तानमधील अनेक नागरिक वैद्यकीय मदतीसाठी स्वराज यांच्याकडे ट्विटरवरुन मदत मागतात. यावर भाष्य करताना त्यांनी ही माहिती दिली.

पाकिस्तानच्या नागरिक असलेल्या आमना शमीन यांनी वैद्यकीय उपचारांसाठी ‘मेडिकल व्हिसा’ देण्याची मागणी सुषमा स्वराज यांच्याकडे केली होती. शमीन यांच्या विनंतीला स्वराज यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. ‘कृपया पाकिस्तानमधील भारतीय उच्चायुक्तांशी संपर्क साधा. आम्ही यासाठी आवश्यक परवानगी देऊ,’ असे स्वराज यांनी म्हटले.  ‘दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर मेडिकल व्हिसासाठी प्रलंबित असलेल्या अर्जांना मंजुरी देण्यात येईल. कायद्याच्या चौकटीत बसणाऱ्या सर्व अर्जदारांना सकारात्मक प्रतिसाद दिला जाईल,’ असे ट्विट स्वराज यांनी केले आहे.