testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

ट्रान्सजेंडर पुरुषाने दिला बाळाला जन्म

baby
ट्रान्सजेंडर व्यक्तींसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. अमेरिकेतील एका ट्रान्सजेंडर पुरुषाने चक्क एका बाळाला ‍जन्म दिला आहे. विशेष असे की हा व्यक्ती गेली अनेक वर्षे महिला म्हणून जगत होती. जन्मास आलेले बाळ हे त्याचे पहिले अपत्य आहे.
विस्कॉन्सिन येथे राहणार्‍या 30 वर्षांच्या केसी सोलिवन याला जगातील पहिला व्यक्ती म्हणून ओळखले जात आहे ज्याने पुरुष आणि महिला दोन्ही रुपांमध्ये राहाता एका बाळाला जन्म दिला आहे. सोलिवनला त्याच्या पहिल्या नवर्‍यापसून जन्मलेला एक मुलगाही आहे. तो आता 5 वर्षांचा आहे. ग्रोसनचा जन्म झाला तेव्हा सोलिवन एक महिला म्हणून जगत असे. दरम्यान, जन्माला आलेले बाळ पूर्णपणे सुरक्षित असून त्याचे वजन 3.6 किलो ग्रॅम इतके आहे.
दरम्यान, 4 वर्षांपूर्वी सोलिवन हिने महिलेच्या रुपातून पुरुषाच्या रुपात येण्यासाठी ट्रांजिशन सुरू केले होते. त्यावेळी ती बिजनेस स्टुडंट होती. दरम्यान, बाळाच्या जन्मानंतर या कपलने आपल्या सेक्सबद्दल खुलासा न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना वाटते की मोठे झाल्यावर मुलांनी स्वत: आपल्या लिंगाबद्दल निर्णय घ्यावा.


यावर अधिक वाचा :