testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

दोन मांजरींच्या नावावर चक्क दोन कोटी रूपये

cat
न्यूयॉर्क- एखादा प्राणी खूप श्रीमंत आहे असे सांगितले, तर कोणीही ही बाब हसण्यावर नेईल, पण न्यूयॉर्कमधील दोन मांजरींची संपत्ती ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणारा नाही. येथील टाइगर आणि ट्रॉय नावाच्या दोन मांजरींच्या नावावर चक्क दोन कोटी रूपये आहेत. आता हे पैसे आले कोठून? असा प्रश्न उपस्थित होणारच.
त्याचे झाले असे की न्यूयॉर्कमध्ये राहणारी एलन ही महिला या माजरींना आपल्या घरचे सदस्य मानत होती. त्यांच्या मुलाचा लहानपणीच मृत्यू झाला, तेव्हापासून त्या मांजरींमध्ये आपले मन रमवू लागल्या. 1989 मध्ये एलन यांच्या पतीचा मृत्यू झाला. त्यामुळे या दोन मांजरी याच त्यांना आधार होत्या.

19 कोटीं रूपयांची मालकीन असणार्‍या एलन यांनी आपल्या मृत्यूपत्रात या दोन मांजरींच्या नावावर दोन कोटी रूपये लिहून ठेवले. आपल्या पश्चात या मांजरींना काही कमी पडू नये. हा त्यामागचा हेतू होता. 2015 मध्ये 88 व्या वर्षी एलन यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूपत्रानुसार, या मांजरींची जबाबदारी एका ट्रस्टकडे देण्यात आली आहे.


यावर अधिक वाचा :