न्यूझीलंड: व्हाईट आयलंड ज्वालामुखीचा उद्रेक, 'अनेक लोक बेपत्ता'

white island crater
Last Modified सोमवार, 9 डिसेंबर 2019 (12:20 IST)
न्यूझीलंडमध्ये एका ज्वालामुखीचा उद्रेक झाला असून त्यानंतर "अनेक लोक बेपत्ता" असल्याचं पंतप्रधान जेसिंडा आर्डन यांनी सांगितलं.
उद्रेक होण्याच्या काही क्षणांपूर्वी अनेक पर्यटक व्हाईट आयलंड किंवा व्हाकारी नावाच्या या ज्वालामुखीच्या कडावर चालताना दिसले होते. या ज्वालामुखीतून बाहेर काढण्यात आलेल्या एका व्यक्तीची प्रकृती चिंताजनक असल्याचं

पोलिसांनी सांगितलं.

व्हाकारी हा न्यूझीलंडच्या सर्वांत सक्रीय ज्वालामुखींपैकी एक मानला जातो. तरीही त्याचे जवळून दर्शन घेण्यासाठी शेकडो पर्यटक दररोज इथे गर्दी करतात. या ज्वालामुखीवरून पर्यटकांसाठी विशेष हवाई सफरीसुद्धा उपलब्ध आहेत.
एका लाईव्ह व्हीडिओ फुटेजमध्ये इथे आलेले काही लोक ज्वालामुखीच्या आतल्या भागात दिसतात, त्यानंतर उद्रेक होतो आणि सर्वत्र काळोख होतो.

"सुरुवातीला आम्हाला वाटलं होतं की साधारण शंभर लोक तिथे होते, मग आता असं वाटतं की 50हून कमी आहेत," पोलिसांनी सांगितलं. "यापैकी काही लोकांना आतून किनाऱ्यावर हलवण्यात आलं आहे. त्यांच्यापैकी एकाची प्रकृती

गंभीर आहे. मात्र अनेक लोक अजूनही बेपत्ता आहेत."
न्यूझीलंडच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्थेनुसार "व्हाईट आयलंडच्या या उद्रेकाला भोवतालच्या परिसराला मोठा धोका आहे."

अशा प्रकारच्या धोक्यांची पूर्वसूचना देणाऱ्या जिओनेट (GeoNet) या वेबसाईटनुसार, घटनास्थळी असलेल्या यंत्रांनी हा धोका आणखी मोठा होईल, अशी कुठलीही शक्यता वर्तवलेली नाही.

मात्र यामुळे होणाऱ्या धुरापासून बचावासाठी लोकांनी या परिसरापासून दूर राहावे, शक्यतो घरांमध्येच, अशी सूचना प्रशासनाने जारी केली आहे.


यावर अधिक वाचा :

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट ...

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट विमानसेवा सुरू करणार आहे
हैदराबादहून आता मालदीवला जाणे सोपे होईल. खरं तर, परवडणारी सेवा देणारी विमान कंपनीची गोएअर ...

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा
प्रत्येक देशात वेगवेगळे कायदे असतात अशात संयुक्त अरब अमिरातील देखील काही कायदे अत्यंत कडक ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची दंड वसुली
मुंबईत कोरोना विषाणुचे संकट कमी होत असले तरी मुंबईकर मात्र कोरोना गांभीर्याने घेत ...

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार
आशिया खंडातील सर्वात मोठा आणि सर्वात प्रतिष्ठित कला महोत्सव म्हणून ओळखला जाणारा काळाघोडा ...

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे आयोजन
पर्यटन संचालनालयामार्फत राज्यातील कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या सहा ...

एसबीआय ते पीएनबीचे गृह कर्ज झाले स्वस्त, परंतु केवळ या ...

एसबीआय ते पीएनबीचे गृह कर्ज झाले स्वस्त, परंतु केवळ या ग्राहकांनाच लाभ मिळेल
चालू आर्थिक वर्षाची समाप्ती जवळ येताच बँकांनी त्यांचे कर्जाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी ...

Pariksha Pe Charcha: पंतप्रधान देतील मार्गशर्न, या प्रकारे ...

Pariksha Pe Charcha: पंतप्रधान देतील मार्गशर्न, या प्रकारे करा नोंदणी
पंतप्रधान नरेंद्र मोदी दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील 'परीक्षा पे चर्चा' करणार आहे. या ...

PM मोदी यांना आणखी एक मोठा सन्मान मिळाला, यांना जागतिक ...

PM मोदी यांना आणखी एक मोठा सन्मान मिळाला, यांना जागतिक ऊर्जा आणि पर्यावरण नेतृत्व पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुक्रवारी केंब्रिज एनर्जी रिसर्च असोसिएट्स वीक ((Cambridge ...

कोणाच्या मनात काय चाललेय?

कोणाच्या मनात काय चाललेय?
कोण काय विचार करतोय हे जाणू इच्छित असाल तर या गोष्टी ध्यानात घ्या. यामुळे समोरचा माणूस ...

मुलाच्या कमाईवर आई वडिलांचाही समान अधिकार

मुलाच्या कमाईवर आई वडिलांचाही समान अधिकार
नवी दिल्ली- पोटगीप्रकरणी न्यायालयानं एक महत्त्वाचा निर्णय देत म्हटले की की कोणत्याही ...