बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: गुरूवार, 14 डिसेंबर 2017 (16:01 IST)

गुगलवर सर्वाधिक सर्च झाला ‘बाहुबली : द कन्क्लुजन’

बॉक्स ऑफिसवर कमाईचे रेकॉर्ड्स करणाऱ्या ‘बाहुबली : द कन्क्लुजन’ हा चित्रपट गुगलवर सर्वाधिक सर्च केला गेला. एस. एस. राजामौली यांच्या ‘बाहुबली : द बिगनिंग’ या चित्रपटानंतर त्याच्या सिक्वलची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. 
 
विशेष म्हणजे गुगलवर विविध भाषांमध्ये या चित्रपटाबद्दल सर्च केलं गेलं. यासोबतच बॉलिवूडच्या सहा चित्रपटांचा सर्वाधिक सर्च केलेल्या पहिल्या दहा विषयांमध्ये समावेश आहे. आमिर खानचा ‘दंगल’ आणि वरूण- आलियाचा ‘बद्रिनाथ की दुल्हनिया’ यांविषयीदेखील गुगलवर सर्वाधिक सर्च केलं गेलं.
 
बॉलिवुड गाण्यांमध्ये अर्जुन कपूरच्या ‘मुबारका’ या चित्रपटातील ‘हवा हवा’ हे गाणं गुगलच्या टॉप ट्रेण्डिंगमध्ये अग्रस्थानी आहे. त्यापाठोपाठ ‘बादशाहो’मधील ‘मेरे रश्के कमर’ हे रिक्रिएटेड व्हर्जन आहे. मनोरंजनपाठोपाठ क्रिकेट विश्वातील घडामोडी गुगलवर या वर्षभरात सर्वाधिक सर्च केल्या गेल्या.