गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By

या अॅपवर पंदरा मिनिटात वाचता येईल पुस्तक!

अमेरिकेचे दिवंगत राष्ट्राध्यक्ष थियोडोर रूझवेल्ट हे एका दिवसात तीन पुस्तके वाचत असत. त्यांनी स्वत:च आपल्या आत्मचरित्रात त्याची माहिती दिली आहे. अर्थात प्रत्येकाला इतक्या वेगाने मोठी पुस्तके वाचता येणे शक्य नाही. मात्र, आता एक असे अॅप बनवण्यात आले आहे ज्यामध्ये अनेक पुस्तकांचा सारांश देण्यात आला आहे. या अॅपच्या सहाय्याने एखादे पुस्तक पंधरा मिनिटातच अशा पद्धतीने वाचून काढता येऊ शकेल.
 
ब्लिंकिटस्टचे सह-संस्थापक निकोलस जॉन्सन यांनी याबाबतची माहिती दिली. ते म्हणाले, कॉलजचे शिक्षण पूर्ण झाल्यावर आम्हाला अवांतर वाचण्यासाठी बराच वेळ मिळू लागला. त्यावेळी स्मार्टफोनचा वापरही वाढला असल्याने पुस्तकेच स्मार्टफोनवर आणावे असा आम्ही विचार केला. ‍तेथूनच ब्लिंकिस्टची सुरूवात झाली. अँड्रॉईड आणि आयओएससाठी उपलब्ध असे हे अॅप अठरा वेगवेगळ्या श्रेणीतील दोन हजरापेक्षाही अधिक पुस्तकांचे संक्षिप्त रूप समोर ठेवते.