शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 8 सप्टेंबर 2017 (09:20 IST)

कोठेही सत्ता नसतांना जळगाव येथे मनसेचा महापौर झाला

निवडणुकी नंतर कोठेही सत्ता नसतांना अचानक राज ठाकरे यांच्या पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महापौर झाला आहे. तर हा महापौर जळगाव येथे झाला आहे. हे शक्य झाले आहे. राज यांची शक्ती फक्त   मुंबई, ठाणे, पुणे , नाशिक मध्येच होती असे चित्र होते. मात्र या सर्व गोष्टी मागे पाडत अचानक  सर्वांनाच धक्का देणारी घटना जळगावात घडली आहे. यामध्ये मनसेचे ललित कोल्हे   जळगावच्या महापौरपदी निवड झाली आहे. 
 

 खान्देश विकास आघाडीचे नितीन लद्धा  या आगोदर महापौर होते.  महापौरपदाचा त्यांनी कार्यकाळ पूर्ण झाला म्हणून  राजीनामा दिला आहे . मनसेचे नगरसेवक असलेले ललित कोल्हे यांची जळगाव महापालिकेचे 11 वे महापौर म्हणून बिनविरोध निवड झाली आहे. मनसेने फक्त 12 नगरसेवक सोबत असताना हे पद मिळवले आहे.हे सर्व शक्य झाले आहे आकड्यांच्या  जुळवाजुळवी मुळे. 

 सुरेश जैन यांच्या खान्देश विकास आघाडीची जळगाव येथे एकहाती  सत्ता होती . मात्र यामध्ये प्रमुख कार्यकर्त्याला संधी मिळावी म्हणून रोटेशन पद्धतीने महापौरपद पाच वर्षे विभागून देण्यात येणार असे ठरले होते. तर ठरल्या प्रमाणे मनसेच्या नगरसेवक महापौर होणार हे उघड होते लद्धा यांनी राजीनामा दिला आणि मनसेचे कोल्हे महापौर झाले आहेत.