मंगळवार, 19 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: नवी दिल्ली , सोमवार, 11 डिसेंबर 2017 (12:21 IST)

मॅक्स बॉर्न यांच्या १३५ व्या जन्मदिनानिमित्त गुगलचे डूडल

क्वांटम मॅकेनिक्स या क्षेत्रात अमुल्य योगदान असलेले विजेते मॅक्स बॉर्न यांना आज त्यांच्या १३५ व्या जन्मदिनानिमित्त गुगलने खास डूडल बनविले आहे. गेस्ट आर्टिस्ट काती झिलागी हिने हे डूडल तयार केले आहे.
 
मुळचे जर्मनीत असलेले मॅक्स बॉर्न यांचा जन्म ११ डिसेंबर १८८२ रोजीचा होता. १९९३ साली यहुदी असल्याचे कारण देत त्यांना विश्व विद्यापीठातून बाहेर काढण्यात आले. यानंतर सी.वी.रमन यांचा प्रस्ताव स्वीकारुन मॅक्स बॉर्न हे बंगळूरूला आले. ते इंडियन इंस्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये स्थायी पद घेऊ इच्छित होते. पण त्यांच्यासाठी पद रिक्त न झाल्याने त्यांना परत जावे लागले. १९५४ साली मॅक्स बॉर्न यांना ‘फंडामेंटल रिसर्च इन क्वांटम मॅकेनिक्स’यासाठी नोबेल पुरस्काराने गौरविण्यात आले. क्वांटम मॅकेनिक्स या क्षेत्रातील त्यांच्या ‘बॉर्न थेरी’चा आजही क्वांटम फिजिक्सच्या प्रत्येक रिसर्चचा आधार आहे.