मंगळवार, 19 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: मंगळवार, 17 एप्रिल 2018 (16:14 IST)

व्होडाफोन-आयडियाचे विलीनीकरण, पाच हजार नोकऱ्या संकटात

व्होडाफोन-आयडिया सेल्युलर या मोबाइल कंपन्यांचे विलीनीकरण लवकरच होणार आहे. यामुळे अनेकांच्या नोकऱ्या धोक्यात येणार आहे. दोन्ही कंपनीमध्ये 21 हजार कर्मचारी काम कार्यरत आहेत.  दोन्हीचे विलनीकरण झाल्यानंतर त्याच्या एक चतुर्थांश म्हणजेच पाच हजार लोकांच्या नोकऱ्या जाण्याची शक्यता आहे. दोन्ही कंपन्या सध्या तोट्यात असून दोन्ही कंपन्यांना कर्मचारी कपात करण्याचा सल्ला नोडल टीमने दिला आहे. 

आयडिया आणि व्होडाफोन या दोन्ही कंपन्यावर 1.20 लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे. ज्यावेळी दोन्ही कंपन्या एक होतील त्यावेळी एकसारखे काम करणारे अनेक जण असतील त्यामुळं दोन्ही कंपन्यांनी कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. आयडिया ग्रुप आदित्या बिर्ला ग्रुपकडून यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. तर दुसरीकडे व्होडफोन कंपनीने याला अफवा असल्याचे म्हटले आहे.