गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: शनिवार, 9 जून 2018 (16:08 IST)

आता जी मेल ला इंटरनेटची गरज नाही

जी मेल आता इंटरनेट शिवाय वापरता येणार आहे. यासाठी  केवळ 5 सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहेत. यात गुगलने जी मेल ला Redesign करण्यासोबतच त्यात अनेक नवे फिचर्स जोडले आहेत. यामध्ये एक खास फिचर म्हणजे ऑफलाईन सपोर्ट आहे. या फिचरच्या सहाय्याने इंटरनेटशिवाय अकाऊंट वापरु शकणार आहात.
 
जी मेल मधील या फिचरमुळे वा ईमेल रिसिव्ह करु शकता तसेच ईमेल डीलिटही करु शकता. इतकचं नाही तर ईमेलही सेंड करु शकता. हे नवं फिचर वापरण्यासाठी क्रोम ब्राऊजर व्हर्जन 61 ची आवश्यकता आहे. पाहूयात कशा प्रकारे हे फिचर वापरता येईल. 
 
स्टेप 1 - सर्वात आधी क्रोम 61 डाऊनलोड करा
स्टेप 2 - Gmailच्या टॉप राईट साईडवर जाऊन gear-like Settings वर क्लिक करा
स्टेप 3 -  ड्रॉप डाउन मेन्युमध्ये 'Settings' टॅबवर क्लिक करा.
स्टेप 4 - आता मेन्युमध्ये जाऊन 'Offline' टॅबवर क्लिक करा.
स्टेप 5 - त्यानंतर ‘Enable offline mail’ पर्यायावर क्लिक करा.