शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By

पतंजलिच्या 'किंभो' अॅप मध्ये त्रुटी, घेतल मागे

योगगुरू रामदेव बाबा यांच्या पतंजलिने व्हॉट्सअॅपलाही पर्याय उपलब्ध करून दिला होता. मात्र त्यांना हे अॅप मागे घ्यावं लागलंय. पतंजलीने व्हॉट्सअॅपला पर्याय म्हणून 'किंभो' नावाचं अॅप मार्केटमध्ये आणलं. गुरूवारपासून हे अॅप युजर्सना वापरता येणार होतं पण याच्या अनेक तक्रारी समोर येऊ लागल्या. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हे अॅप वापरण्याजोगे नसल्याचे युजर्सचे म्हणणे होते. या अॅपमध्ये काही त्रुटी नव्हत्या पण आम्ही प्रायोगिक तत्वावर हे लॉंच केलं होत असे  पतंजलीचे प्रवक्ते एस. के. तिजारावाला यांनी सांगितले.
 
यातील त्रुटी दुर करुन 'किंभो' अॅप लवकरच उपलब्ध करुन दिले जाणार आहे. सध्या तरी या अॅपमधील डेटा सुरक्षीत राहत नव्हता असे युजर्सचे म्हणणे आहे.  हे अॅप प्ले स्टोअरवर आल्यानंतर मोठ्या संख्येने हे डाऊनलोडही करण्यात आलं होतं.