testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

जिओकडून प्राईम ग्राहकांसाठी नवीन प्लॅन्स

reliance jio
Last Modified शुक्रवार, 10 नोव्हेंबर 2017 (11:14 IST)

जिओने प्राईम ग्राहकांसाठी नवीन प्लॅन्सची घोषणा केली आहे.

या प्लॅन्समध्ये जिओ आपल्या विशेष ग्राहकांना अनेक सुविधांसह २५९९ रुपये नकदी स्वरूपात कॅशबॅक देणार आहेत. ज्याचा वापर तुम्ही काही ठराविक जागी खरेदी करताना करू शकता. कंपनीने सांगितले की, अमेजनपे, पेटीएम व फोनपे यांसारख्या अनेक कंपन्यांशी जिओने हातमिळवणी केली आहे. या प्लॅनमध्ये प्राईम ग्राहकांना ३९९ रुपये व त्याहून अधिक रूपयांच्या रिचार्जवर ४०० रुपयांचे व्हाउचर मिळेल. तर जिओचे पार्टनर प्रत्येक रिचार्जवर ३०० रुपये तात्काळ कॅशबॅक देतील.


'अजियो डाट कॉम' वर १५०० रुपयांची खरेदीवर जिओ ग्राहकांना ३९९ रुपयांची सूट दिली जाईल. तर यात्रा डॉट कॉमवर विमान तिकीट खरेदीवर १००० रुपयांची सूट मिळेल. रिलायंसट्रेंड्स वर १९९९ रुपयांच्या खरेदीवर ५०० रुपयांची सूट कंपनीच्या प्राईम ग्राहकांना मिळेल. या संधीचा लाभ जिओ प्राईम ग्राहकांना १० नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर २०१७ पर्यंत घेता येईल.यावर अधिक वाचा :