गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Updated : शुक्रवार, 23 फेब्रुवारी 2018 (17:20 IST)

Reliance Jio:यूजर्सला लागणार आहे झटका, बंद होणार आहे ही सेवा

Reliance Jioचा वापर करणार्‍या यूजर्सला लवकरच मोठा झटका लागणार आहे. Jio लवकरच एक मोठी सर्व्हिस बंद करणार आहे.   
 
मीडियाहून आलेल्या वृत्तानुसार, रिलायंस जियो आपली वॉलेट सर्विस जियो मनी (jio money)ला बंद करणार आहे. jio money 27 फेब्रुवारीपासून बंद होणार आहे. या संदर्भात यूजर्सला मेसेज पाठवण्यात येत आहे. सांगण्यात आले आहे की आरबीआयच्या गाइडलाइन्समुळे jio moneyला कंपनी बंद करणार आहे.   
 
जियो मनी (jio money)चे म्हणणे आहे की आरबीआयच्या गाइडलान्समुळे सर्व बँका ट्रांसफर वॉलेटच्या माध्यमाने 27 फेब्रुवारी नंतर होऊ शकणार नाही. कोणालाही त्रास होऊ नये यासाठी ग्राहक 26 फेब्रुवारीपर्यंत मोफत एकदा बँक ट्रांसफरची सुविधा  घेऊ शकता. त्यानंतर ही सेवा बंद करण्यात येईल.   
 
जियो पेमेंट बँकसाठी वाट बघावी लागेल   
 
तसेच, पेमेंट बँकची सेवा सुरू करण्याची योजना आखत असलेली रिलायंस जियोला अद्याप ही सेवा सुरू करण्यास वेळ लागू शकतो. यामागे आरबीआयची गाइडलाइन्स सांगण्यात येत आहे, ज्यात कंपन्यांना नो योर कस्टमर (केवाईसी)ला पूर्ण करण्यास सांगण्यात आले आहे.