सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: गुरूवार, 31 जानेवारी 2019 (19:28 IST)

एसबीआयचा सर्व्हर सुरक्षित नाही, महत्त्वाची माहिती सार्वजनिक होण्याचा धोका

स्टेट बँक ऑफ इंडियाला आपल्या ग्राहकांची संवेदनशील माहिती लिक झाली आहे. एका रिपोर्टनुसार, एसबीआयनं आपल्या महत्त्वपूर्ण सर्व्हरला सुरक्षित ठेवण्यात चूक केलीय. याचमुळे लाखोंच्या संख्येत बँक खात्यांची संवेदनशील आणि महत्त्वाची माहिती सार्वजनिक होण्याचा धोका निर्माण झालाय. या सर्व्हरमध्ये बँक खात्यांच्या माहितीशिवाय खात्यात उपलब्ध असलेल्या बॅलन्सशी निगडीत अनेक महत्त्वपूर्ण सूचनाही होत्या.
 
 
Techcrunch नं जाहीर केलेल्या एका रिपोर्टनुसार, या संदर्भात एका शोधकर्त्यानं (resercher) सूचना दिली होती. त्यानंतर त्यानं याबद्दल विस्तृत माहिती मिळवण्याचा प्रयत्नही केला. शोधकर्त्यानं दिलेल्या माहितीनुसार, एसबीआयकडून सर्व्हरला सुरक्षित ठेवण्यासाठी कोणताही पासवर्ड दिला गेला नव्हता. त्यामुळे कोणताही व्यक्ती हा डाटा सहज मिळवू शकतो.