मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

अंबाबाईच्या किरणोत्सवास सुरुवात, सूर्यकिरणांनी केला देवीच्या गळ्याला स्पर्श

करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या उत्तरायणातील किरणोत्सवास सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी मावळतीच्या प्रखर सूर्यकिरणांनी देवीच्या गळ्याला स्पर्श केला. सायंकाळी 6 वाजून 13 ते 6 वाजून 17 मिनिटांदरम्यान  किरणे चरणस्पर्श करून देवीच्या गळ्यापर्यंत पोहोचली. पहिल्या दिवशीच किरणे देवीच्या गळ्यापर्यंत पोहोचल्याने अभ्यासकांसह, भाविकांतून समाधान व्यक्‍त करण्यात आले.
 
नोव्हेंबरमध्ये झालेल्या किरणोत्सवापूर्वी किरणोत्सव मार्गातील अडथळे दूर करण्यात आल्याने त्याचा परिणाम उत्तरायणातील किरणोत्सवातही दिसून आला. दिवसभर स्वच्छ सूर्यप्रकाश राहिला. सायंकाळीही सूर्याची किरणे तीव्र मिळाल्याने गाभार्‍यात प्रवेश केलेल्या किरणांची तीव्रता 8 लक्स इतकी मिळाली. त्यामुळे उत्तरायणातील किरणोत्सव पूर्ण क्षमतेने होण्याची आशा वाढली आहे.