शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: मंगळवार, 20 फेब्रुवारी 2018 (15:00 IST)

गुगलने 'व्ह्यू इमेज' ऑप्शन काढला

गुगलने सर्च इंजिनमधून 'व्ह्यू इमेज' हा ऑप्शन  काढुन टाकला आहे. या फिचरमुळे यूजरना फोटो ओरिजनल साईझमध्ये पाहता येत होता. एवढच नाही तर हा फोटो डाऊनलोड करणंही सोपं जात होतं. पण आता फोटोंना ओरिजनल साईझमध्ये डाऊनलोड करणं कठीण होणार आहे. गुगलनं या सगळ्या बदलांबाबत ट्विटरवरून माहिती दिली आहे.

गेटी इमेजसोबत गुगलनं केलेल्या करारामुळे व्ह्यू इमेजचा ऑप्शन हटवण्यात आल्याचं बोललं जात आहे. याचबरोबर गुगलवर असलेल्या गेटीच्या फोटोवरही कॉपी राईटची माहिती देणं बंधनकारक करण्यात आलं आहे. परवानगी न घेता फोटो सहज डाऊनलोड होत असल्यामुळे अनेक फोटोग्राफर्सनी नाराजी व्यक्त केली होती. कॉपीराईट असूनही हे फोटो इमेज सेक्शनमधून अगदी सहज डाऊनलोड करता येत होते. गेटी इमेजनंही अशीच तक्रार केली होती. फोटोग्राफर्स आणि वेबसाईटनं गुगलच्या या बदलाचं स्वागत केलं आहे.