testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

आता वाय-फाय वापरुन करा कॉल

Last Modified बुधवार, 25 ऑक्टोबर 2017 (16:17 IST)

वाय-फायचा वापर करुन कॉल करता येणार आहे. दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) अशाप्रकारे इंटरनेटच्या वापराने फोन कॉलिंगला परवानगी दिली आहे. मात्र ट्रायच्या या निर्णयाला अनेक टेलिकॉम कंपन्यांनी विरोध दर्शवला आहे.

इंटरनेटव्दारे फोन लावता आला तर टेलिकॉम कंपन्यांचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. मागील काही काळात इंटरनेटच्या वापरामुळे टेलिकॉम कंपन्यांच्या उत्पन्नामध्ये आधीच घट झाली आहे. त्यात अशाप्रकारे फोन कॉलिंगही वाय-फायच्या आधारे करता यायला लागले तर या कंपन्यांचे उत्पन्न जास्त धोक्यात येण्याची शक्यता आहे. असे असले तरी, अशी सेवा सुरू झाल्यास ग्राहकांसाठी ही अतिशय आनंदाची बाब असेल कारण त्यांना मोबाईल फोनसाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्कातून सूट मिळेल. तसेच फोन कॉलिंगसाठी रेंजची अडचण राहणार नाही.यावर अधिक वाचा :