शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 25 एप्रिल 2019 (09:48 IST)

महिला मतदारांची संख्या वाढविण्यासाठी नवा फंडा

महिला मतदारांची संख्या वाढविण्यासाठी निवडणूक आयोगाने नवा फंडा शोधून काढला आहे. मतदानासाठी येणाऱ्या महिलांना सॅनेटरी पॅड देण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. हा प्रयोग प्रथमच मुंबईच्या उपनगरातील ‘सखी’ मतदान केंद्रावर राबवला जाणार आहे. यासाठी मतदानासाठी ‘सखी मतदान केंद्र’ उभारण्यात आले आहेत. या मतदान केंद्रावर अधिकाऱ्यापासून ते कर्मचाऱ्यापर्यंत सर्व मतदान प्रक्रिया महिलांद्वारे पार पाडली जाते अशा केंद्रावरच मतदानासाठी येणाऱ्या महिलांना सॅनेटरी पॅड दिले जाणार आहेत. मुंबईच्या 26 विधानसभा मतदारसंघांत हा प्रयोग केला जाणार आहे. त्यासाठी कुर्ला, अंधेरी आणि बोरिवली असे तीन प्रशासकीय उपविभाग करण्यात आले आहेत.