बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: मंगळवार, 17 जुलै 2018 (08:54 IST)

फेसबुक वेड, दुचाकी चालवतांना केले लाईव्ह, २ ठार

छत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्यात  वेगाने दुचाकी चालवत असताना फेसबुक लाईव्ह करणे दोन तरुणांच्या जिवावर बेतले आहे. याघटनेत छत्तीसगडमधील बस्तर येथील मनीष कुमार आणि मुरली निषाद हे दोघे ताशी १९९ किमी प्रतितास वेगाने दुचाकी चालवत होते. मनीष कुमार दुचाकी चालवत होता तर त्याचा मित्र मुरली निषाद मागच्या सीटवर बसला होता. आपल्या मित्राची वेगाने दुचाकी चालवण्याची कामगिरी मुरली फेसबुकवर लाईव्ह करत होता. मनीषही फेसबुक लाईव्हकडे अधून-मधून लक्ष देत होता. यावेळी मित्रांकडून मिळणाऱ्या कमेंटमुळे त्यांना अधिकच चेव चढला. परंतु कांकेरजवळील चारामा भागामध्ये समोरच्या दिशेने येणाऱ्या बसकडे तरुणांचे लक्षच गेले नाही आणि बस चालकालाही काही समजायच्या आत दुचाकी समोरून बसवर जोरात धडकली.
 
सदरच्या अपघातामध्ये मनीषचा जागीच मृत्यू झाला तर मुरलीला स्थानिकांनी उपचारासाठी रुग्णालयात भरती करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला. दरम्यान, तरुणांना वाचवण्याच्या प्रयत्नात बस चालकाने कच्चून ब्रेक दाबल्याने बसमधील प्रवासी जखमी झाले आहेत. ही बस कांकेरवरून रायपूरकडे जात होता. यात ३८ प्रवासी होते. जखमी प्रवाशांवर स्थानिक रुग्णालयात उपचार करण्यात आले.

फोटो: सोशल मीडिया  साभार