रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: शुक्रवार, 7 सप्टेंबर 2018 (16:21 IST)

साराचं ग्रॅज्युएशन झाला पूर्ण

माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची मुलगी सारानं तिचं ग्रॅज्युएशन पूर्ण केलंय. सारानं युनिव्हर्सिटी ऑफ लंडनमधून मेडिसिनमध्ये ग्रॅज्युएशनची डिग्री मिळवलीय. सारानं स्वत:च आपल्या ऑफिशिअल इन्स्टाग्राम अकाऊंटवरून आपल्या ग्रॅज्युएशन सेरेमनीमधले काही फोटो शेअर करत याची माहिती दिलीय. साराच्या ग्रॅज्युएशन सेरेमनीसाठी अंजली आणि सचिनही लंडनमध्ये दाखल झाले. सारानं या कार्यक्रमातले काही फोटो शेअर केलेत. यामध्ये, आपल्या मुलीचं हे यश पाहून आनंदीत झालेले सचिन आणि अंजलीही दिसत आहेत. सारानं आपलं शालेय शिक्षण मुंबईतल्या धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून पूर्ण केलंय. त्यानंतर ग्रॅज्युएशनसाठी ती लंडनला गेली होती.