बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: सोमवार, 10 सप्टेंबर 2018 (16:54 IST)

स्वित्झलँडमध्ये श्रीदेवीचा पुतळा उभारणार

श्रीदेवी प्रती असलेलं प्रेम व्यक्त करत स्विस सरकारने तिला आदरांजली वाहणार आहे. श्रीदेवी बॉलिवूडमधील अशी अभिनेत्री आहे जिच्या सिनेमांमध्ये स्वित्झलँडचं शुटिंग अधिक होतं. या सिनेमांच्या माध्यमातून भारतीय पर्यटक स्वित्झलँडकडे अधिक आकर्षित झाले. यश चोप्रा यांच्यानंतर आता स्वित्झलँडमध्ये श्रीदेवीचा पुतळा उभारण्यात येणार आहे. श्रीदेवी ही पहिली अभिनेत्री आहे जिने स्वित्झलँडच्या डोंगरांवर गाणं चित्रीत केलं आहे. श्रीदेवीचा स्वित्झलँड पर्यटनातील योगदान पाहता हा पुतळा उभारण्यात येणार आहे. श्रीदेवीच्या सिनेमांमधून स्वित्झलँडमधील सुंदर लोकेशन्स जगभराच पोहचले. श्रीदेवी आणि शाहरूख खानच्या अनेक सिनेमांमुळे पर्यटक येथे आले. इथे येणारे पर्यटक त्या जागांना पुन्हा भेटी देतात. त्यामुळे सिनेमातील तो क्षण उभा राहतो. 1994 मधील 'संगम' हा सिनेमा स्वित्झलँडमध्ये शूट केला आहे.