testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

2018 मध्ये सावध राहा.... या राशींवर पडणार शनीचा प्रभाव

मेष

मेष राशीवर शनीच्या ढय्याचा प्रभाव सुरू होणार. या लोकांसाठी पूर्ण वर्ष अनपेक्षित राहील, कधीही काहीही घडू शकतं कारण प्रत्येक गोष्ट अस्थिर राहील. आरोग्यदृष्ट्या हे वर्ष उत्तम राहील परंतू रोजगार आणि व्यवसाय क्षेत्रात समस्या उद्भवू शकतात. स्वत: मानसिक रूपाने स्थिर राहा आणि नोकरीला आविष्य समजून बसू नका. या वर्षी आपली खोट्या आरोपाखाली फसवणूक होऊ शकते.

वृषभ
या वर्षी रस्त्यात येणार्‍या समस्या आणि अडचणींना कुणीही थांबवू शकत नाही. कोणतेही परिवर्तन आपल्या हातात नाही. आपल्या साठी हे वर्ष काही विशेष नाही. शनी आपल्या जीवनात कष्ट घेऊन येत आहे. व्यवसायात विस्तार करू शकता परंतू काही गोष्टींमुळे तडजोड करावी लागेल.

मिथुन
विवाह करण्याचे मन बनवले असतील तर कुटुंब आणि मित्रांचा पूर्ण सहयोग मिळेल. चिडचिड होऊ शकते पण त्याचा काही विशेष किंवा विपरित परिणाम होणार नाही. विवाहात जरा अडचणी येतील तरी दोन महिन्यात सर्व सुरळीत होईल. आपण वाहन, घर आणि दागिन्यांमध्ये गुंतवणूक करू शकता.

कर्क
या वर्षी व्यवसायात वाढ होईल. धनप्राप्ती होईल परंतू आपण आणि आपला साथीदार गंभीर संकटात अडकू शकतात किंवा आपल्यात वाद निर्माण होऊ शकतं. कर्ज फेडून टाकाल ज्याने लोकं खूश होतील. एकूण या वर्षी आपण उत्सव साजरा करणार आहात. ज्या स्त्रियांना प्रजनन संबंधी समस्या असतील त्या वर्षाच्या शेवटी सुटतील.

सिंह
आपल्या कुटुंबावर असलेले संकट दूर होईल आणि खरेदीची संधी सापडेल. आपण घर, वाहन आणि जमिनीत गुंतवणूक करू शकतात. आपले सीनियर आपल्यावर खूश राहतील. कोणावरही अत्याचार करू नका आणि आपले चांगले जीवन बरबाद होण्यापासून वाचवा.

कन्या
आपल्याला नोकरीसाठी खूप प्रयत्न करावे लागतील. व्यवसाय आणि खाजगी जीवनात अनावश्यक समस्यांना समोरा जावं लागेल. यावर्षी काही मोठी संधी मिळणे जरा अशक्यच दिसतंय तसेच जेवढं कमवाल तेवढं खर्चही होईल.

तूळ
या वर्षी आपले आरोग्य उत्तम राहील. पैसा येईल पण खर्चही लागले राहतील. जीवनात जरा अस्थिरता येईल पण सकारात्मक परिणामासाठी संयम बाळगा. मन लावून काम करा, कुणाचे लक्ष नाही हा विचार करून टाळू नका. लोकांशी चांगले संबंध बनवून ठेवा.

वृश्चिक
आपल्या जीवनात अचानक काहीच बदल येणार नाही परंतू काही चांगले नक्कीच घडेल. आपल्या आरोग्यामुळे आपण आपल्या कामावर लक्ष देऊ शकणार नाही. कामात लक्ष नसल्यामुळे सीनियर नाराज होऊ शकतात. या वर्षी यात्रा घडतील. बाह्य लोकांवर विश्वास ठेवणे धोकादायक ठरेल.

धनू
या वर्षी आपण आजारी राहू शकता आणि जीवनात अनेक चढ- उतार देखील बघावे लागतील. आपण ज्या व्यवसायाबद्दल विचार करत आहात ते अस्थिर असू शकतं. नवीन प्रॉपर्टी खरेदी करून लोकांना आश्चर्यात टाकाल. लोकांची नजर लागू शकते म्हणून सावध राहा.

मकर
या वर्षी आपले मन अशांत राहील म्हणून आपल्या शांततेची खूप गरज भासेल. यात्रा घडतील. भरभराटी राहील. कुटुंब आणि मित्रांची मदत मिळेल. आपल्या कुटुंबासाठी हे वर्ष उत्तम राहील.

कुंभ
या वर्षी आपल्या मागील समस्यांचे विश्लेषण केले जाऊ शकते आणि त्यामुळे आपल्या लाभ किंवा हानी होऊ शकते. शक्योतर जुने प्रकरण उघडकीस आणू नका. आर्थिक स्थिती चांगली राहील. कोणाकडूनही अपेक्षा न ठेवता स्वत:च्या हिमतीवर पुढे वाढा. जुने वाद सुटतील.

मीन
आपली कमाई वाढेल अर्थातच आर्थिक स्थिती मजबूत होईल. अनेक व्यवसाय संधी मिळतील. जवळीक व्यक्ती आपल्याला धोका देऊ शकतो. कोणतीही सरकारी समस्या सोडवण्यासाठी समजूतदार व्यक्तीची निवड करा.


यावर अधिक वाचा :

वयाच्या 25 वर्षापर्यंत ब्रह्मचर्य का?

national news
आयुर्वेदाप्रमाणे मनुष्य 113 वर्ष जिवंत राहतो. तसेच हिंदू धर्मात मनुष्याच्या जीवनाचे 100 ...

आत्मा न स्त्री असते न पुरूष

national news
जीवात्मा ही ना पुरूष असते ना स्त्री ना नपुंसक असते. ती जेव्हा शरीर धारण करते तेव्हाच तिचा ...

पाळा काही धार्मिक नियम

national news
शिव मंदिरात झांज वाजवू नये. सूर्य मंदिरात शंख आणि देवीच्या मंदिरात बासरी वाजवू ...

देवळात का जायचे?

national news
देवळे अशाच ठिकाणी बांधलेली असतात जिथे प्रचंड शुभ ऊर्जा असते. देवळे म्हणजे जणू काही ...

अन्न- संस्कार

national news
शुचिर्भूत होवून व्यक्ती ताटासमोर बसल्यावर प्रथम ताटाच्या मध्यभागी बरोबर समोर मीठ ...
Widgets Magazine

इंदू मल्होत्रा वरिष्ठ वकिलाहून थेट न्यायाधीश

national news
सर्वोच्च न्यायालयात वरिष्ठ वकिलाहून थेट न्यायाधीश बनणा-या वरिष्ठ वकील इंदू मल्होत्रा या ...

आयआयटी मुंबईची सौरचूल सर्वात अव्वल

national news
आयआयटी पवईत मुंबईतील तरुण शास्त्रज्ञांनी बनवलेली सूर्यप्रकाशावर चालणारी सौरचूल देशात नंबर ...

सोने आणि चांदीच्या किंमती सतत वाढ

national news
गेल्या दोन दिवसांपासून सोने आणि चांदीच्या किंमती सतत चढताना दिसत आहेत. अक्षय तृतीयानंतर ...

स्कूल व्हॅनला भीषण अपघात, १३ विद्यार्थ्यांचा मृत्यू

national news
उत्तर प्रदेशातील कुशीनगर येथे रेल्वे गाडी आणि स्कूल व्हॅनला भीषण अपघात झाला असून या ...

शिक्षा ऐकल्यानंतर आसाराम बापू न्यायालयात रडला

national news
बलात्कार प्रकरणी आसारामला जन्मठेपेची शिक्षा ऐकल्यानंतर आसाराम बापू न्यायालयात रडला. या ...