testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

अनिल अंबानीने वीज व्यवसाय विकला

Last Modified शुक्रवार, 22 डिसेंबर 2017 (09:58 IST)

अनिल अंबानी समूहातील रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचा मुंबई उपनगरासाठीचा वीजनिर्मिती, वीजपारेषण आणि वीजवितरणाचा व्यवसाय गुजरातमधील प्रख्यात अदानी समूह विकत घेणार आहे, असे गुरुवारी जाहीर करण्यात आले. या समूहातील अदानी ट्रान्स्मिशन लिमिटेड कंपनी त्यासाठी तब्बल १३,२५१ कोटी रुपये रिलायन्सला देणार आहे. मार्च २०१८ पर्यंत हा व्यवहार पूर्ण होऊन एप्रिल २०१८ पासून अदानी ताबा घेईल, असा अंदाज आहे.

अनिल धीरूभाई अंबानी समूह आर्थिकदृष्टय़ा संकटात असून मार्च २०१७ अखेर समूहातील विविध कंपन्यांवर एकूण सव्वा लाख कोटी रुपयांचे कर्ज होते. त्यामुळे आपले विविध व्यवसाय विकून कर्जातून मुक्त होण्याचे धोरण आखण्यात आले आहे.यावर अधिक वाचा :