शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

हीरो डेस्टिनी 125 स्कूटर लाँच, किंमती सोबत फीचर्स देखील प्रभावी

हीरोने आपला पहिला 125 सीसी स्कूटर लाँच केला आहे. कंपनीने या स्कूटरला दोन वेरियंट्समध्ये लाँच केले आहे. डेस्टिनी 125 एलएक्स आणि डेस्टिनी 125 व्हीएक्स. हे डेस्टिनी 125 हीरो स्कूटर, कंपनीच्या 110 सीसी ड्युईटवर आधारित आहे. ज्यामध्ये कंपनीने नवीन दृष्टिकोन देण्यासाठी अनेक बदल केले आहे.
 
कंपनीने फ्रंट डिस्क ब्रेक, इंटिग्रेटेड ब्रेकिंग सिस्टिम (आयबीएस), साइड स्टँड इंडिकेटर, सर्व्हिस रिमाइंडर, पास स्विच आणि वास्तविक इंधन भरण्याची अनेक उत्कृष्ट वैशिष्ट्ये समाविष्ट केली आहे. 
 
गेल्या काही वर्षांमध्ये 125 सीसी विभागामध्ये स्कूटर बाजारात खूप डिमांड होती हे लक्षात घेत हीरोने हा पुढाकार घेतला आहे.
 
नवीन स्कूटरमध्ये 125 सीसीचे नवीन सिलेंडर इंजिन असणार. इंजिनाची 6750 आरपीएमवर 8.7 बीएचपीची ऊर्जा आणि 5000 आरपीएमवर 10.2 एनएम पीक टॉर्क उत्पन्न करण्याची क्षमता आहे. डेस्टिनी 125 एलएक्सची किंमत 54,650 रुपये आणि डेस्टिनी 125 व्हीएक्सची किंमत 57,500 रुपये आहे.
 
या किंमती स्कूटर लाँचिंगमुळे आता इतर कंपन्या सतर्क झाल्या आहेत.