testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

घर खरेदीवर ३ ते ४ लाखापर्यंत सबसिडी

Last Modified शनिवार, 6 जानेवारी 2018 (15:59 IST)
घर खरेदी करणाऱ्यांना होम लोनच्या व्याजावर सबसिडी मिळणार आहे. ईडब्‍ल्‍यूएस, एलआईजी और एमआईजीवर ३१ मार्च २०१९ पर्यंत सबसिडी दिली जाणार आहे. त्यामूळे तुमचे घर तुम्हाला ३ ते ४ लाखापर्यंत स्वस्त मिळणार आहे. जर वार्षिक उत्पन्न ३ लाखाहून कमी असणाऱ्यांना ३० वर्ग मीटर कारपेट आकाराचे घर घेता येऊ शकते. यावर ६.५ टक्के सबसिडी मिळू शकते. तर ६ लाखाहून कमी वार्षिक उत्पन्न असल्यास ६० वर्ग मीटर कारपेट असलेला फ्लॅट खरेदी करु शकता. यातील होम लोनवर तुम्हाला ६.५ टक्के सबसिडी मिळेल.

जर तुमचे वार्षिक उत्पन्न ६ लाखाहून अधिक आणि १२ लाखापेक्षा कमी असेल तर तुम्ही एमआयजी कॅटगरीमध्ये असाल. यानुसार १२९० स्क्वेअर फूट घर घेण्यावर तुम्हाला सबसिडी मिळेल. कारपेट साईजवर हा फायदा मिळतो. या आकारात २ ते ३ बीएचकेचे फ्लॅट मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. या कॅटगरी वाल्यांना ४ टक्के सुट मिळते. तर जर तुमचे वार्षिक उत्पन्न १२ लाखाहून अधिक आणि १८ लाखाहून कमी असेल तर तुम्ही एमआयजी-२ या कॅटगरीत मोडता. या साईजमध्ये ३ बीएचकेवाले फ्लॅट उपलब्ध आहेत. या कॅटगरीसाठी ३ टक्के व्याज मिळणार आहे.


यावर अधिक वाचा :