testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

एसबीआय ग्राहकांना खुशखबर

sbi bank
Last Modified मंगळवार, 2 जानेवारी 2018 (09:54 IST)

एसबीआयने आपल्या बेस रेट आणि मार्क प्राइम लेंडिंग रेटमध्ये ३० बेसिस पॉईंटने कपात करण्याची घोषणा केली आहे. एसबीआयचे नवे दर १ जानेवारी २०१८ पासून लागू झाले आहेत. एसबीआय स्टेट बँक ऑफ इंडियाने आपला बेस रेट ८.९५ टक्क्यांवरुन ८.६५ टक्के केला आहे. तसेच बीपीएलआरही १३.७० टक्क्यांवरुन १३.४० टक्के केला आहे. याचा फायदा एसबीआयच्या जवळपास ८० लाख ग्राहकांना होणार आहे.

एसबीआयने घेतलेल्या या निर्णयामुळे गृह कर्ज घेणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच बँकेने गृह कर्जाच्या प्रोसेसिंग शुल्कात दिलेली सूट ही ३१ मार्चपर्यंत वाढवली आहे.यावर अधिक वाचा :