रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 2 जानेवारी 2018 (09:48 IST)

पाकिस्तान सरकार सईदची संपत्ती ताब्यात घेणार

जमात उद-दावाचा म्होरक्या आणि मुंबईतील 26/11 दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदच्या आर्थिक नाड्या आवळायला पाकिस्तान सरकारने सुरुवात केली आहे. हाफिज सईदच्या संस्था आणि आर्थिक संपत्ती पाकिस्तान सरकार ताब्यात घेणार आहे. 
प्रांतीय सरकार आणि विभागला पाठवलेल्या गुप्त आदेशात सरकारच्या या प्लॅनचा उल्लेख आहे. अमेरिकेने हाफिज सईदला दहशतवादी घोषित केलं आहे. याशिवाय त्याच्या जमात-उद-दावा आणि फलाह-ए-इन्सानियत या संघटनांनाही दहशतवादी संघटनेच्या श्रेणीत ठेवलं आहे.