Widgets Magazine
Widgets Magazine

मुंबईकर व पुणेकरांना ‘BackToThe90s’ ही खास सेवा

उबर ही जगातील सर्वात मोठी ऑन-डिमांड राइड शेअरिंगची सुविधा देणारी कंपनी आणि ड्रूम हे भारताचे आघाडीचे ऑनलाइन ऑटोमोबाइल बाजारस्थळ बालदिनानिमित्त मुंबईकर व पुणेकरांना ‘BackToThe90s’ ही खास सेवा देणार आहेत. या सेवा मुंबई व पुण्यामध्ये १४ नोव्हेंबर २०१७ रोजी दुपारी १ ते ३ वाजेपर्यंत उपलब्ध असणार आहेत.
मुंबई व पुण्यामधील या खास सेवांच्या माध्यमातून उबर राइडर्सना ९०च्या दशकातील सफरीचा आनंद अनुभवता येईल. या अनुभवामध्ये‍ ड्रूम.इनद्वारे समर्थित कॉन्टेसा, अॅम्बेसेडर, एनई१८८ या ९०च्या दशकातील कार्समधील राइडचा समावेश असेल. या राइडचा आनंद घेत असताना प्रवाशांना खास सरप्राईजेज देखील देण्यात येतील. या विशेष सेवेचा लाभ प्रवाशांना उबर अॅपवर लॉग ऑन केल्यावर ‘नॉ‍स्टेल्जिया’ या खास राइड पर्यायावर क्लिक करून घेता येईल.


यावर अधिक वाचा :