testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

सोलापूरचा ऋषी अंधारे ठरला चरणदास चोर ‘i Phone X’ चा मानकरी

charandas chor
Last Modified मंगळवार, 2 जानेवारी 2018 (11:04 IST)
गेली महिनाभर फेसबुकवर जिथे पाहावे तिथे ‘चरणदास चोर’ अशी अक्षरे लिहिलेल्या रंगीबेरंगी पत्र्याच्या ट्रंक सोबतच्या फोटोजने अक्षरश: धुमाकुळ घातला होता. जो तो त्या रंगीबेरंगी ट्रंक सोबत अत्यंत नाटकीय पद्धतीने फोटो काढून फेसबुकवर अपलोड करत होता. त्याचं कारणही तसंच होतं. कारण, त्या ट्रंकसोबत फोटो काढणाऱ्याला सध्याचा सर्वात अद्ययावत i Phone X बक्षीस मिळणार होता. चरणदास चोर या चित्रपटाच्या प्रमोशनचा भाग म्हणून चित्रपटातील महत्त्वाची व्यक्तिरेखा असलेल्या रंगीबेरंगी पत्र्याच्या ट्रंक घेऊन एक ऑनलाईन स्पर्धा राबविण्यात आली होती. त्या स्पर्धेतून भाग्यशाली विजेता निवडण्याची सोडत आज फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून थेट करण्यात आली. आणि सोलापूरचा ऋषि अंधारे हा सर्वाधिक लाईक्स मिळविण्याच्या विभागातून दुसऱ्या क्रमांकावर असलेला तरूण लकी ड्रॉ पद्धतीने अंतीम विजेता घोषित करण्यात आला. सोलापूरच्या ऋषि अंधारे ने i Phone X या स्मार्टफोनचा मानकरी ठरला आहे.
या स्पर्धेसाठी महाराष्ट्रभरातून हजारो फोटोज चरणदास चोर या फेसबुकपेजवर टॅग होत होते. त्यातील सर्वात जास्त लाईक्स मिळविणारे आणि सर्वात कल्पक तसेच नाटकीय पद्धतीने काढलेले फोटो असे दोन विभाग होते. त्यातून अकरा आघाडीवर असलेल्या स्पर्धकामधून लकी ड्रॉ पद्धतीने विजेता निवडण्यात आला. घोषित केल्याप्रमाणे १ जानेवारी २०१८ रोजी संध्याकाळी ७ वाजता चरणदास चोर या चित्रपटाच्या अधिकृत फेसबुक पेजवरून लकी ड्रॉ थेट प्रसारीत करण्यात आला.
मुंबई-पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील मल्टिप्लेक्स मध्ये चरणदास चोर या चित्रपटातील रंगीबेरंगी ‘श्यामराव’ट्रंक ठेवण्यात आली होती. त्याच बरोबर महाराष्ट्रातील जवळपास २५ महाविद्यालयांमध्ये आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये प्रमोशन कार्यक्रमादरम्यान ती ट्रंक नेण्यात आली होती. त्यामुळे फेसबुकवर जिथे पाहावे तिथे त्या रंगीबेरंगी ट्रंकसोबतचे फोटोज झळकत होते. प्रसिद्धीच्या या अनोख्या तंत्रामुळे २९ डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेला ‘चरणदास चोर’तिकीट बारीवर देखील जोर पकडून आहे. प्रेक्षकांनी दिलेल्या उदंड प्रतिसादामुळे लेखक-दिग्दर्शक श्याम माहेश्वरींसह युनीट प्रोडक्शनचे दीपा माहेश्वरी आणि संजु होलमुखे हे निर्मातेही मराठी रसिकप्रेक्षकांप्रती कृतज्ञ आहेत.


यावर अधिक वाचा :

रीना चा "कॅरी ऑन" व्हिडीओ सोशल मीडिया वर वायरल

national news
निसर्ग हि मानवाला लाभलेली सर्वात मोठी भेट आहे. निसर्गामुळे मानव आणि इतर सजीव जगू शकतात. ...

'डोण्ट वरी बी हॅप्पी'मध्ये दिसणार स्वानंदी

national news
उमेश कामत आणि स्पृहा जोशीने गाजवलेल्या 'डोण्ट वरी बी हॅप्पी' या नाटकातील प्रणोतीची जागा ...

तिसरे आंतरराष्ट्रीय लघु - चित्रपट महोत्सव पुणे २०१८

national news
दरवर्षी प्रमाणे यंदाही शिवस्वराज्य प्रतिष्ठान तर्फे, तिसरे आंतरराष्ट्रीय लघु - चित्रपट ...

यंदाच्या उन्हाळी सुट्टीतील सर्वात माहौल मेसेज

national news
नवरा ऑफिसात असतांना अकोल्याची काजोलबाई मुलांना घेऊन उन्हाळ्याच्या सुट्ट्यांसाठी माहेरी ...

‘संजू’ चा टीझर लॉन्च

national news
संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित बायोपिकचा टीझर लॉन्च करण्यात आला. ८५ सेकंदांच्या या ...