testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

कार्तिक-अर्जुन जोडीच्या जीसिम्सच्या यशाचे पंचसूत्र

arjun singh
Last Modified शनिवार, 9 सप्टेंबर 2017 (15:17 IST)
मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक सुप्रसिद्ध सिनेमा तसेच जाहिरातींचे वितरण व निर्मितीमध्ये अग्रेसर असलेल्या जीसिम्स संस्थेने,
आपल्या कार्यकाळात अनेक उपक्रम राबविले आहेत. जीसिम्सचे खंदे शिलेदार अर्जुनसिंग बरन आणि कार्तिक निशानदार या जोडीने आपल्या संस्थेअंतर्गत मराठी चित्रपटसृष्टीत एक नवा आयाम रोवला आहे. नवीन होतकरू कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याबरोबरच,
चित्रपटाचे व्यवस्थापन व विपणन,
उपग्रह एकत्रीकीकरण तसेच दूरध्वनी मालिका आणि चित्रपटांच्या निर्मितीचे कामदेखील जीसिम्स करते.

या संस्थेने चित्रपटाच्या व्यवस्थापन आणि विपणन कार्यात आतापर्यंत एकूण ३० मराठी चित्रपटांची यशस्वी धुरा सांभाळली आहे. ज्यात मितवा,
प्यारवाली लव्हस्टोरी,फ्रेंड,
वृंदावन,
फुगे,
लपाछपी आणि नुकताच प्रदर्शित झालेल्या
'भिकारी'
या सिनेमांचा समावेश होतो. त्याचप्रमाणे निर्मितीक्षेत्रात पाऊल टाकताना फुगे या बहुचर्चित सिनेमापासून त्यांनी सुरुवात केली असून,
आगामी
'तुला कळणार नाही'
हा सिनेमा देखील' जीसिस्म'

निर्मितीसंस्थेअंतर्गत लवकरच प्रदर्शित होत आहे. तसेच वायकोमची संयुक्त निर्मिती असलेल्या
'वारस'
या सिनेमाचीदेखील लवकरच घोषणा केली जाणार आहे.


मराठीच्या मोठ्या पडद्यावर यशस्वी कामगिरी बजावणाऱ्या कार्तिक - अर्जुनच्या या जोडीने छोट्या पडद्यावरील निर्मितीमध्येदेखील आपली विशेष मोहोर उमटवली आहे. ज्यात
'कोण होईल मराठी करोडपती', 'इमा मराठी संगीत पुरस्कार'
या कार्यक्रमाचा समावेश होतो,
तसेच लक्स झकास नायिका पाहिले पर्व आणि फेअर एंड लवली नायिका दुसरे पर्व या दोन टेलेंट शोची
निर्मितीसुद्धा केली आहे.मराठी सिने तसेच जाहिरात जगतातील विपनन आणि निर्मितीक्षेत्रात आपले बहुमुल्य योगदान देणारी जीसिम्स मराठीचा सुपरस्टार स्वप्नील जोशी आणि अभिनेत्री मुक्ता बर्वे या दोन प्रसिद्ध कलावंताचे जनसंपर्कदेखील करते. मराठी सिने वर्तुळात त्यांची कारकीर्द मोठी असून,
नियोजनबद्ध कामामुळे कार्तिक-अर्जुन जोडीने व्यवस्थापन आणि निर्मिती क्षेत्रात आपले विशेष स्थान प्रस्थापित केले आहे. भविष्यात देखील त्यांचा हा कार्यकाल अविरत चालू राहणार असून,
जीसिम्सअंतर्गत अनेक कालाक्र्ती सादर करत रसिकांचे मनोरंजन करण्याचा आमचा मानस असल्याचे कार्तिक निशानदार आणि अर्जुन बरन स्पष्ट करतात.


यावर अधिक वाचा :

मित्राचा फुकटचा सल्ला

national news
रमेश... मानसोपचार तज्ज्ञाकडे रोज रात्री झोपताना वाटणाऱ्या भिती बद्दल इलाज करायला ...

सैफ अली खान बनणार नागा साधू

national news
सैफ अली खानची नवीन वेब सिरीज 'द सॅक्रीड गेम्स' सध्या वेगवेगळ्या कारणामुंळे चर्चेत आहे. या ...

'धडक'चा क्लायमॅक्स जान्हवीकडून लीक ?

national news
अभिनेत्री जान्हवीला 'धडक'च्या क्लायमॅक्सबद्दल विचारण्यात आलं तेव्हा तिनं याची कल्पना ...

नवरा-बायकोचं भांडण

national news
नवरा-बायकोचं भांडण होतं. बायको - (रागाने) ते माझे आवडते तीन शब्द म्हण. नवरा - आय लव्ह ...

अक्षय कुमार माझा रोल मॉडेल

national news
अक्षय कुमारबरोबर 'टॉयलेट एक प्रेमकथा'मध्ये काम केलेली भूमी पेडणेकर अक्षयलाच आपला रोल ...