शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 4 मार्च 2024 (13:26 IST)

सैराट फेम रिंकू राजगुरुला धक्काबुक्की

Rinku Rajguru
जळगाव येथे शासनाच्या वतीने महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरूंने उपस्थितीत लावली होती. या कार्यक्रमात तिने सैराट चित्रपटाचे डायलॉग म्हटले तसेच गाण्यावर नृत्य करत प्रेक्षकांची मने जिंकली. कार्यक्रमानंतर काही उत्साही प्रेक्षकांनी तिला भेटण्यासाठी गर्दी करत तिला धक्काबुक्की केली. तर एकाने तिचा हात धरला. या मुळे ती चांगलीच संतापली. यावर सैराट फेम आर्चीने चाहत्यांना खडेबोल सुनावले.ती म्हणाली " तुमच्या मुलीला कोणी अशी धक्काबुक्की केली तर चालेल का?  
महासंस्कृती महोत्सवाच्या कार्यक्रमात आर्चीने "मराठी कळत नाही का  इंग्रजीत सांगू " असा सैराट चित्रपटाचा डॉयलॉग देखील म्हणून दाखवला आणि झिंगाट गाण्यावर नृत्य करत जळगावकरांची मने जिंकली.या कार्यक्रमात तिने जळगावकरांशी संवाद साधला. लोकांनी देखील तिला चांगला प्रतिसाद दिला.  यावेळी मंत्री गुलाबराव पाटील सुद्धा उपस्थित होते.या कार्यक्रमाचा मोठ्या जल्लोषात समारोप करण्यात आला मात्र आर्चीला प्रेक्षकांनी केलेल्या धक्काबुक्की मुळे या कार्यक्रमाला गालबोट लागले. 
 
 Edited by - Priya Dixit