testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

आपल्या प्रत्येक भूमिकेत समरस होणारे कलाकार "शेखर फडके"

shekhar fadke
Last Modified मंगळवार, 9 जानेवारी 2018 (11:24 IST)
आपल्या अभिनयाने रंगभूमीवर स्वतःची ओळख निर्माण करणारे शेखर फडके, आपल्याला तसे ओळखीचेचं आहेत. अनेक नाटकांमधून, मालिका आणि चित्रपटांमधून आपल्याला त्यांच्या अभिनयाचे विविध पैलू पाहायला मिळाले आहेत. आपल्या अभिनयाच्या जोरावर त्यांनी प्रत्येक भूमिका जिवंत केली आहे. "तो मी नव्हेच","घर श्रीमंताचं","स्माईल प्लिज", "एका लग्नाची गोष्ट", "वन टू काफोर", "क्रॉस कनेक्शन", "बुढा होगा तेरा बाप", "गोष्ट तुझी माझी, "जादू तेरी नजर", "लेले विरुद्ध लेले", "जो भी होगा देखा जायेगा", "पहिलं पहिलं" यांसारखी नाटके तर 'सरस्वती' सिरीयल मधला "भिकुमामा", 'झोका' मधला "कान्हा",
'दिल्या घरी तू सुखी रहा' मधला "लक्ष्मीकांत", 'वादळवाट', "साहेब बीवी आणि मी", "४०५ आनंदवन",,"कु कूच कु", "तू भेटशी नव्याने", "माझिया प्रियाला प्रीत कळेना", यांसारख्या अनेक मालिकांबरोबरच "धो धो पावसातील वन डे मॅच", "नवरा अवली बायको लवली", "थैमान", "शिवामृत", "भागमभाग" यांसारखे अनेक सिनेमे त्यांनी केले आहे. नाटक असो मालिका, सिनेमा असो या प्रत्येक विभागात त्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात आपले वेगळें स्थान निर्माण केले. कलाकार म्हणून काम केल्यानंतर त्यांनी आपल्या एका नव्या भूमिकेला सुरुवात केली, हि भूमिका म्हणजे नाट्यनिर्मिती आणि दिग्दर्शक होय. "जो भी होगा देखा जायेगा" या नाटकातुन त्यांच्यातला नाट्यनिर्माता आणि दिग्दर्शक आपल्याला पाहायला मिळाला. या नाटकात शेखर यांनी निर्माता दिग्दर्शक आणि अभिनेता अशा तिहेरी भूमिका केल्या होत्या. आतापर्यंत शेखर फडके यांनीं "जो भी होगा....आणि "पहिलं पहिलं " या नाटकांसाठी त्यांनी दिग्दर्शन केले आहे. आपल्या विनोदी शैलीतल्या अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांना सतत खळखळून हसवले. मी निर्मित, शिरीष लाटकर लिखित "जे आहे ते आहे" या त्यांच्या सेमी कमर्शिअल नाटकातसुद्धा त्यांनी तिहेरी भूमिका साकारली आहे. या नाटकाचे खास वैशिष्ट्य म्हणजे या नाटकाला नेपथ्याची आणि जागेची अट नाही, असे हे 2 अंकी कॉमेडी धमाल नाटक आहे. तसंच "स्मार्ट सुनबाई", "धुमशान", "चालता बोलता", "फुल 2 धमाल" यासाठी त्यांनी सूत्रसंचालन सुद्धा केले आहे. या बरोबरच शेखर आपल्याला दर रविवारी रात्री 9 वाजता झी टॉकीजवरील "नसते उद्योग" या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमातून संजय नार्वेकर, प्रियदर्शन जाधव, नम्रता आवटे यांच्यासोबत हसवायला भेटणार आहेत.


यावर अधिक वाचा :

बाळासाहेब यांचा मराठी आवाज या मराठी कलाकाराचा

national news
शिवसेना प्रमुख तसेच तमाम मराठी तरुण राजकारनी यांचे आदर्श दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यावर ...

दुबई गाजवणार अवधूत,श्रेयसचा मराठी 'जल्लोष'

national news
अवधूत गुप्ते आणि श्रेयस जाधव यांचा म्युझिकल कॉन्सर्ट "जल्लोष २०१८". याच महिन्यात ...

राधिका आपटेवर स्टॅना कॅटिक फिदा

national news
राधिका आपटे मॅजिकल आहे, अशा शब्दात अेरिकेन अभिनेत्री स्टॅना कॅटिकने राधिकाचे कौतुक केले ...

‘बधाई हो’बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक काळ चालणारा चित्रपट

national news
आयुषमान खुरानाचा‘बधाई हो’सलग आठ आठवडे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला आहे. कोणतीही ...

यंदा १० ते १७ जानेवारी दरम्यान पिफचे आयोजन

national news
पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातही (पिफ) महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीची दखल ...