शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 6 फेब्रुवारी 2018 (15:48 IST)

सपोर्ट स्टाफमधील सर्वांना समान पारितोषिक पाहिजे

अंडर- १९ वर्ल्ड कप जिंकणाऱ्या भारतीय संघातील खेळाडूंना बीसीसीआयने प्रत्येकी ३० लाख रुपये, सपोर्ट स्टाफला प्रत्येकी २० लाख रुपये आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडला ५० लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर केले. मात्र यावरच द्रविड नाराज आहे. खेळाडू आणि सपोर्ट स्टाफपेक्षा मुख्य प्रशिक्षकाला जास्त रकमेचे पारितोषिक जाहीर केल्याबद्दल द्रविडने नाराजी दर्शवली. सपोर्ट स्टाफमधील सर्वांना समान पारितोषिक दिले पाहिजे, असे द्रविडचे म्हणणे असून दुजाभाव होऊ नये यावर द्रविडने भर दिला आहे. सपोर्ट स्टाफमधील प्रत्येक सदस्याने एक टीम म्हणून काम केले आणि भारताला वर्ल्ड कपच्या विजेतेपदापर्यंत पोहोचवण्यात योगदान दिले. त्यामुळे सर्वांना समान पारितोषिकच मिळाले पाहिजे, अशी द्रविडची भूमिका आहे. 

सपोर्ट स्टाफमध्ये गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांब्रे, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक अभय शर्मा, फिजिओथेरेपिस्ट योगेश परमार, ट्रेनर अनंत दाते, मंगेश गायकवाड आणि व्हिडिओ अॅनेलिस्ट देवराज राऊत यांचा समावेश आहे.