testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

धोनी चेन्नईचाच, विराटला बेंगळुरुने तर रोहितला मुंबईने राखले

टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी पुन्हा एकदा संघाच्या पिवळ्या जर्सीमध्ये दिसणार आहे. चेन्नईचा संघ दोन वर्षांनी पुन्हा एकदा यंदाच्या आयपीएल मोसमात पुनरागमन करत असून या संघाने 15 कोटी रुपये मोजून आपल्या संघात धोनीला कायम राखले आहे. याशिवाय र‍वींद्र जडेजा आणि सुरेश रैना यांनाही संघात कायम ठेवण्यात आले आहे. बीसीसीआयने याबाबत घोषणा केली. दरम्यान आयपीएल 2018 साठी पुढच्या महिन्यात खेळाडूंचा लिलाव होणार आहे.
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली यंदाच्या मोसमातही रॉयल चॅलेजर्स बेंगळुरु संघाकडून खेळणार आहे. याशिवाय दिग्गज फलंदाज एबी डिविलियर्सलही बेंगळुरु संघाने कायम राखले आहे. मुख्य म्हणजे विराटला आपल्या संघात कायम ठेवण्यासाठी आरसीबीला 17 कोटी रुपये शुल्क मोजावे लागले असून एखाद्या खेळाडूला संघात कायम ठेवण्यासाठी मोजावी लागलेली ही सर्वाधिक रक्कम आहे.

टीम इंडियाचा सलामीवीर रोहित शर्मा आणि अष्टपैलू हार्दिक पंड्या हे मुंबई संघात यंदा कायम असणार आहेत. याशिवाय ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ पुन्हा राजस्थान रॉयल्ससाठी खेळेल तर ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार सनरायजर्स हैदराबात संघाकडूनच या मोसमातही खेळतील.
कुणी कोणाला राखले
चेन्नई सुपरकिंग्ज: महेंद्र सिंग धोनी, सुरेश रैना, रवींद्र जडेजा
दिल्ली डेअरडेविल्स: ऋषभ पंत, ख्रिस मॉरिस, श्रेयस अय्यर
रॉयल चेंलेजर्स बेंगळुरु: विराट कोहली, एबी डिविलियर्स, सरफराज खान
मुंबई इंडियन्स: रोहित शर्मा, हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह
कोलकता नाइट रायडर्स: सुनील नारायण, आंद्रे रसेल
किंग्ज इलेव्हन पंजाब: अक्षर पटेल
राजस्थान रॉयल्स: स्टीव्ह स्मिथ


यावर अधिक वाचा :

कॉंग्रेसचे प्रियांका अस्त्र २०१९ मध्ये रायबरेलीतून निवडणूक ...

national news
अनके ठिकाणी पराभव आणि मोदी यांना टक्कर देत देत कशी बशी उभ्या असलेल्या कॉंग्रेस ने अखेर ...

आता सॅरिडॉन, डी कोल्डसहीत 343 औषधांवर येणार बंदी सरकारचा ...

national news
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सॅरिडॉन, डी कोल्डसहीत 343 औषधांवर बंदी घालण्यात येणार आहे. ...

प्लास्टिक बंदीचा पहिला बळी, आर्थिक नुकसान व्यापाऱ्याची ...

national news
धक्कादायक प्रकार घडला आहे. राज्यात प्लास्टिक बंदी लागू झाल्यानंतर नागपूर येथील दिवाळखोरीत ...

"मला शिवाजी व्हायचंय" या व्याख्यानाने होणार तरुणाईचा जागर

national news
मुंबई: मालाड नववर्ष स्वागत समिती आणि प्रबोधक युथ फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने समर्थ ...

दगडाच्या खाणीत स्फोट, ११ ठार

national news
आंध्र प्रदेशातील कुरनूल जिल्ह्यातील हाथी बेलगल येथील दगडाच्या खाणीत शुक्रवारी रात्री ...