बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: नवी दिल्ली , सोमवार, 14 ऑगस्ट 2017 (09:33 IST)

वन-डे मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर : युवराज “आऊट’, मनीष पांडे “इन’

श्रीलंका दौऱ्यावरील कसोटी मालिकेत शानदार प्रदशर्नानंतर आता एकदिवशीय आणि टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. यात युवराज सिंगला वगळण्यात आले असून त्याच्या जागी कर्नाटकचा युवा फलंदाज मनीष पांडे याला संधी देण्यात आली आहे. तर आर. अश्‍विन आणि रविंद्र जडेजा यांना विश्रांती देण्यासाठी संघातून वगळण्यात आले आहे.
 
तीन सामन्यांची कसोटी मालिका संपल्यानंतर विराट ब्रिगेड श्रीलंकेसोबत 5 एकदिवशीय आणि एक टी-20चा सामना खेळणार आहे. ही मालिका 20 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघातील 15 खेळांडूमध्ये अक्षर पटेल, कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल हे तीन फिरकीपटू असून जसप्रीत बुमराह, भुवनेश्‍वर कुमार आणि शार्दुल ठाकूर यांच्यावर वेगवान गोलंदाजीची जबाबदारी असणार आहे.
 
निवड समितकडून अपेक्षेप्रमाणे आर. अश्‍विन व रवींद्र जडेजा यांना विश्रांती देण्यात आली असून त्यांच्या जागी यजुवेंद्र चाहल, अक्षर पटेल व कृणाल पांड्या यांचा समावेश करण्यात आला आहे. झटपट क्रिकेटमधील स्पेशालिस्ट म्हणून वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहलाही संघात स्थान देण्यात आले आहे.
 
भारतीय संघ ः विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, मनीष पांडे, अजिंक्‍य रहाणे, केदार जाधव, एमएस धोनी (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि शार्दुल ठाकुर.