मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 6 नोव्हेंबर 2018 (11:57 IST)

सामन्याआधी बदल स्टेडियमचं नाव

भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये मंगळवारी अर्थात आज लखनऊमध्ये संध्याकाळी दुसरी टी-२० मॅच होणार आहे. पण त्याआधी उत्तर प्रदेशच्या योगी सरकारनं इथल्या स्टेडियमचं नाव बदललं आहे. इकना आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम असं नाव असलेल्या या स्टेडियमचं नाव आता भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम असं ठेवण्यात आलंय. शहर नियोजन खात्याचे मुख्य सचिव नितीन रमेश गोकर्ण यांनी ही माहिती दिली आहे.
 
अखिलेश यादव मुख्यमंत्री असताना इकना स्टेडियमच्या बांधकामाला सुरुवात झाली होती. या स्टेडियमचं उद्घाटन २०१७ साली करण्यात आलं होतं. तब्बल २४ वर्षानंतर लखनऊमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटचं आगमन होणार आहे. याआधी १९९४ साली श्रीलंकेविरुद्ध लखनऊच्या केडी सिंह बाबू स्टेडियममध्ये आंतरराष्ट्रीय मॅच खेळवण्यात आली होती. यानंतर सगळ्या आंतरराष्ट्रीय आणि आयपीएलच्या मॅच कानपूरमध्ये खेळवण्यात आल्या. या नव्या मैदानात ५० हजार प्रेक्षक बसून मॅचचा आनंद घेऊ शकतात.