शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: हैदराबाद , सोमवार, 15 ऑक्टोबर 2018 (11:37 IST)

दुसऱ्या कसोटीच्या विजयासह 2-0 ने मालिकाही जिंकली

भारत आणि वेस्टइंडिज यांच्यातील दोन कसोटी सामन्याची मालिका भारताने 2-0 अशी जिंकली आहे. हैदराबाद येथे झालेल्या दुसऱ्या कसोटीत भारताने वेस्ट इंडिज संघाचा 10 गडी राखून पराभव केला आहे.
 
दुसऱ्या डावात विजयासाठी असलेले 72 धावांचे लक्ष्य भारताने 16 षटकांत बिनबाद 75 धावा करत गाठले. भारताकडून दुसऱ्या डावात पृथ्वी शाॅ याने 33 तर लोकेश राहुल याने 33 धावा केल्या.
 
उमेश यादवची सर्वोत्तम कामगिरी
उमेश यादवने पहिल्या डावात 88 धावात 6 बळी घेत सर्वोत्तम कामगिरी केली तर दुसर्‍या डावात त्याने 45 धावात 4 गडी टिपले. असे एकूण उमेशने 133 धावात सामन्यात 10 गडी टिपले. हैदराबादच्या मैदानातही भारतीय गोलंदाजाने केलेली ही सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. याआधी झहीर खानने न्यूझीलंडविरुद्ध 2010 साली 68 धावांत 4 बळी घेतले होते.
 
हैदराबाद कसोटीतील विक्रम 
* कसोटी क्रिकेटमध्ये विंडीजवर 10 गडी राखून मात करण्याची भारताची ही पहिलीच वेळ ठरली.
 
* इम्रान खाननंतर एका प्रतिस्पर्ध्याविरोधात फलंदाजीत 50 च्या वर तर गोलंदाजीत 25 च्या खाली सरासरी राखणारा रविचंद्रन अश्विन दुसरा गोलंदाज ठरला आहे.
 
* घरच्या मैदानात कसोटी सामन्यात 10 विकेट घेण्याची कामगिरी करणारा उमेश यादव तिसरा गोलंदाज ठरला आहे. याआधी कपिल देव आणि जवागल श्रीनाथ यांनी अशी कागिरी केली आहे.
 
* कसोटी क्रिकेटमध्ये 4 चेंडूंमध्ये 3 बळी घेणारा उमेश यादव तिसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे.
 
* वेस्ट इंडीजचे दोन्ही सलामीवीर शून्यावर बाद होण्याची ही सातवी वेळ ठरली.
 
* वयाच्या 18 व्या वर्षी भारतासाठी विजयी धाव काढणारा पृथ्वी शॉ सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे.
 
* आशिया खंडात कर्णधार या नात्याने विराट कोहलीने 4 हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे, विराटने पाकिस्तानचा माजी कर्णधार सिबाह उल हकचा विक्रम मोडला आहे.