testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

क्रोएशियाचा नायजेरियावर विजय

fifa football
कलिनीनग्राड| Last Modified सोमवार, 18 जून 2018 (10:43 IST)
नाजेरियाचा खेळाडू ओगेनेकारो इटेबो याने केलेला स्वयंगोल आणि लुका मोड्रीक याने पेनल्टी स्पॉटवरून केलेला गोल यामुळे क्रोएशियाने नाजेरिाचा 2-0 असा पराभव केला आणि विश्वचषक स्पर्धेत विजयी सलामी दिली.

मध्यांतरास काही मिनिटे शिल्लक असताना ओगेनेकारो याने स्वयंगोल केला. त्यामुळे क्रोएशियाला मध्यांतरास 1-0 अशी आघाडी मिळाली. त्यानंतर 71 व्या मिनिटास स्पॉट किकवरून मोड्रीकने जाळीचा निशाणा साधाला व क्रोएशियाचा विजयावर शशिक्कामोर्तब केले.

मध्यांतरापर्यंत दोन्ही संघामध्ये अटीतटीचा खेळ सुरू होता. 62 व्या मिनिटाला अहमद मुसा हा नाजेरियाच्या अलेक्स इवोबी याच्या जागी मैदानात उतरला. 66 व्या मिनिटास क्रोएशियन बॉक्समध्ये व्हिक्टर मोसेस आला. परंतु, रेफ्रीने नायजेरयाच्या बाजूने निर्णय दिला नाही.

70 व्या मिनिटास क्रोएशियाला पेनल्टी मिळाली. नायजेरियाच्या विलियम इकोंग याने मारिओ मांडझुकीक याच्याविरुध्द खेळताना फाऊल केला. त्यामुळे रेफ्रीने विलियमला पिवळे कार्ड दाखविले. लुका मोड्रीकने या संधीचा लाभ घेत गोल केला. त्यानंतर दोन्हीही संघांनी गोल करण्याचे प्रयत्न केले; परंतु त्यांना शय मिळाले नाही. क्रोएशियाच्या संघाने नायजेरियाचा संघ गोल करू शकणार नाही याची काळजी घेतली. नायजेरियाच्या गोलरक्षकाने क्रोएशियाचे अनेक प्रयत्न निष्फळ ठरविले.
ड गटातील पहिल्या सामन्यात नवख्या आइसलँडने मेस्सीच्या अर्जेंटिना संघास 1-1 असे बरोबरीत रोखले. त्यानंतर क्रोएशियाने नायजेरियाला हरवत ड गटात तीन गुणांसह अव्वल स्थान घेतले.

आइसलँडचा गोलरक्षक हानेस पोर हालडोरसन याने अर्जेंटिनाचा गोल थोपविला व त्याने मेस्सीची पेनल्टी निष्फळ ठरविली. नायजेरियाचे प्रशिक्षक गेरनॉट रोहर यांनी आपला संघ बचावात कमकुवत पडला हे मान्य केले. पुढील आठवड्यात होणार्‍या सामन्यात अर्जेंटिनाला क्रोएशियाविरुध्द व नायजेरियाला आइसलँडविरुध्द विजय आवश्यक बनला आहे.


यावर अधिक वाचा :

भाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश

national news
दिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...

स्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले

national news
स्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...

मराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार

national news
मराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...

भारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम

national news
बीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...

मोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...

national news
भारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...

सीएनजी भरणे झाले सोपे, घ्या बाईल अॅप्लिकेशनची मदत

national news
सीएनजी भरणे ही एकच समस्या नसते तर त्यामुळे आसपासच्या भागात वाहतूक कोंडीही दिसून येते. ...

सॅमसंग गॅलॅक्सी A7 (2018) सह अनेक सॅमसंग फोन्स स्वस्त

national news
सॅमसंग बेस्ट डेज सेल 6 डिसेंबर रोजी सुरू झाली आणि ती 31 डिसेंबरपर्यंत कायम राहील. ...

मराठा आरक्षण कोर्टात टिकणार नाही - रामदास आठवले

national news
मराठा आरक्षणासंदर्भात न्यायालयीन लढ्यासाठी तयार असून, असा दावा राज्यातील भाजपा ...

कांदा भाव पडले, कमावलेले ६ रुपयांची मनीऑर्डर शेतकऱ्याने ...

national news
सध्या राज्यात कांद्याच्या दरात घसरण झाली आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या ...

राम शिंदे विरोधात शिवसेनेचे जोडे मारो आंदोलन

national news
सगळा महाराष्ट्र भीषण दुष्काळाचे चटके सहन करीत आहे. अशा अवस्थेत शेती करणे तर सोडून द्या, ...