testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

रोनाल्डोने मारली ५१ वी हॅट्ट्रिक, सामना बरोबरीत सुटला

Last Modified शनिवार, 16 जून 2018 (15:29 IST)
फुटबॉल वर्ल्डमध्ये चुरशीच्या लढतीत पोर्तुगाल आणि स्पेन हा सामना बरोबरीत सुटला. निर्णायक क्षणी पोर्तुगालच्या ख्रिस्तियानो रोनाल्डोने संघाला ३-३ अशी बरोबरी मिळवून दिली. सामना अनिर्णित राहिल्याने दोन्ही संघाच्या खात्यात एक–एक गूण जमा झाला आहे. पोर्तुगालतर्फे तिन्ही गोल रोनाल्डोने मारले असून त्याची फुटबॉल कारकिर्दीतील ही ५१ वी हॅट्ट्रिक ठरली.
या सामन्यात सगळ्याचे लक्ष खिस्तियानो रोनाल्डोवर होते. तर स्पेनकडे दिग्गज खेळाडूंची फौज होती. सामन्याची सुरुवात होताच चौथ्याच मिनिटाला स्पेनच्या खेळाडूच्या चुकीमुळे पोर्तुगालला गोल करण्याची आयती संधी मिळाली. पेनल्टी दरम्यान रोनाल्डोने ही संधी गमावली नाही. रोनाल्डोने चौथ्या मिनिटाला संघासाठी पहिला गोल मारला आणि सामन्यात आघाडी घेतली.

मात्र, यानंतर स्पेनच्या डिएगो कोस्टाने २४ व्या मिनिटाला गोल मारुन संघाला बरोबरी मिळवून दिली. ४४ व्या मिनिटाला रोनाल्डोने दुसरा गोल मारल्याने पोर्तुगालने २ - १ अशी आघाडी घेतली. हाफ टाइमनंतर ५५ व्या मिनिटाला डिएगो कोस्टाने गोल मारुन पुन्हा एकदा संघाला बरोबरीत (२–२) आणले. अवघ्या तीन मिनिटांनी स्पेनच्याच नॅचोने तिसरा गोल मारला आणि स्पेनने ३- २ अशी आघाडी घेतली. यानंतर स्पेनच्या खेळाडूंनी उत्तम बचाव करत रोनाल्डो आणि त्याच्या टीमला गोल करण्यापासून रोखून ठेवले.
सामना संपण्यासाठी काही मिनिटे शिल्लक असताना स्पेनच्या खेळाडूने चुक केली आणि ८८ व्या मिनिटाला रोनाल्डोने पेनल्टीवर अप्रतिम गोल मारत संघाला ३ - ३ अशा बरोबरीत आणले. रोनाल्डोची फुटबॉल कारकिर्दीतील ही ५१ वी हॅट्ट्रिक ठरली. तर फुटबॉल वर्ल्डकपमध्ये त्याची ही पहिलीच हॅट्ट्रिक आहे. फुटबॉल वर्ल्डकपमध्ये एका खेळाडूने एका सामन्यात तीन गोल केल्याची ही ५१ वी वेळ आहे.


यावर अधिक वाचा :

विचित्र स्वप्ने रोखण्याचा उपाय सापडला

national news
शास्त्रज्ञांनी जनुकांची अशी एक जोडी शोधली असून तिच्या मदतीने रात्री झोपेत लोकांना पडणारी ...

भारतात समलैंगिकता आता गुन्हा नाही, सुप्रीम कोर्टाचा ...

national news
समलैंगिकता आता भारतात गुन्हा नाही, असा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सुप्रीम ...

काय आहे #DeleAlliChallenge...शाहिद आणि रणबीर कपूरने ही केले ...

national news
सोशल मीडियावर ‘किकी चॅलेंज’ नंतर आता ‘डेले अली चॅलेंज’ ट्रेड होत आहे. या चॅलेंज मध्ये ...

SC/ST ऍक्ट : भारत बंदचा मध्यप्रदेशमध्ये प्रभाव, शाळा, ...

national news
भोपाळ- SC/ST ऍक्ट संशोधन विरुद्ध सवर्णांद्वारे भारत बंदचा मध्यप्रदेशात प्रभाव दिसून आला. ...

दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच

national news
एमआयचे दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच केले आहेत. Xiaomi RedMiचे हे ...

माल्या म्हणतो ईडी चे चुकले

national news
विजय मल्ल्याला आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अंमलबजावणी संचलनालयाने फरार घोषित करावे अशी ...

मोदी हे 'कमांडर इन थिफ राहुल यांची टीका

national news
पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींवर बोचऱ्या शब्दांत राफेल विमान खरेदी व्यवहारावरून काँग्रेस ...

शेती करणार ड्रोन आणि त्यांचे रक्षण व फवारणीही

national news
अंतराळ संशोधन क्षेत्रात काम करणारी बेंगलोर येथील INS या संस्थेतील शास्त्रज्ञ कृषीविषयक ...

शुल्लक करणातून युवकाने केला खून

national news
कळंब पोलिस ठाणे अंतर्गत येत असलेल्या चापर्डा येथे शुल्लक कारणावरून एका अल्पवयीन मुलाने ...

Motorola One Power झाला लाँच, हे आहे धमाकेदार फीचर्स

national news
Motorola One Power ला भारतात लाँच करण्यात आले आहे. फीचर्सची गोष्ट केली तर मोटोरोला वन ...