बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. फिफा विश्वचषक
Written By
Last Modified: गुरूवार, 14 जून 2018 (09:06 IST)

विश्वचषक फुटबॉल स्पर्धा, पहिला सामना रशिया विरुद्ध सौदी अरब

तब्बल महिनाभर रंगणा-या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या महासंग्रामाला गुरुवारपासून सुरुवात होणार आहे. यजमान रशिया पूर्णपणे फुटबॉलमय झाले असून ज्या शहरांमध्ये सामने रंगणार आहेत तेथे फुटबॉलप्रेमींचा उत्साह शिगेला पोहचला आहे. रशियातील सर्वच ११ यजमान शहरांमध्ये चाहत्यांनी जल्लोष करण्यास सुरुवात केली आहे. एक महिना रंगणाऱ्या या फुटबॉल मेळावाचा पहिला सामना ६० हजार प्रेक्षक क्षमतेच्या लुजनिकी स्टेडियममध्ये खेळविण्यात येईल. यावेळी यजमान रशिया सौदी अरबविरुद्ध दोन हात करेल.
 
त्याचवेळी रशियन नागरिक मोठ्या उत्साहामध्ये विदेशी पाठिराखे आणि पर्यटकांचे स्वागत करत आहेत. एक आठवड्यापूर्वीच दक्षिण अमेरिकेच्या पाठिराख्यांनी एकत्रितपणे रेड स्केअर परिसतात फेरी काढली आणि येथील दुकानदारांसह फोटोही काढले. यावेळी, काही स्थानिक लोकांनी सकारात्मकपणे सर्वांना पाठिंबा देत ‘रुस रुस’असा नाराही दिला.