रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 14 डिसेंबर 2017 (15:37 IST)

पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारी विरुष्काची पत्रिका

इटलीत विराट कोहली आणि अनुष्का शर्माचा विवाहसोहळा पार पडल्यानंतर आता त्यांच्या रिसेप्शनची जोरदार तयारी सुरू झाली आहे. विरुष्काने अवघ्या ४४ लोकांच्या उपस्थितीत लग्न केले असले तरी मित्र- परिवारासाठी ग्रँड रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले आहे. २१ डिसेंबर रोजी दिल्लीत २६ डिसेंबर रोजी मुंबईत मोठ्या थाटामाटात रिसेप्शन पार पडणार आहे. दिल्लीच्या रिसेप्शनच्या आमंत्रण पत्रिकांची झलक सोशल मीडियावर याआधी पाहायला मिळालेली. आता मुंबईतल्या रिसेप्शनची आमंत्रण पत्रिका सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. दिग्दर्शक महेश भट्ट यांनी बुधवारी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर ही आमंत्रण पत्रिका पोस्ट करत विराट- अनुष्काला शुभेच्छा दिल्या. या पत्रिकेसोबतच एक रोपटे पाहायला मिळत आहे. हे रोपटे लावून पर्यावरण रक्षणाचा अनमोल संदेश विरुष्काने पाहुण्यांना दिला आहे.